Saturday, May 4, 2024

Latest Posts

Nashik चा तिढा सोडवण्यात मुख्यमंत्र्यांना यश, ठाण्यात मध्यरात्री गुप्त भेट

गेल्या काही दिवसांपासून नाशिक नाशिक मतदारसंघावरून महायुतीत जोरदार स्पर्धा चालू असल्याचे दिसून येत आहे. त्यावर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांचं नाशिक मतदार संघासाठीच नाव जवळपास निश्चित झाल्याचं कळून येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक मतदारसंघावरून महायुतीत जोरदार स्पर्धा चालू असल्याचे दिसून येत आहे. त्यावर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांचं नाशिक मतदार संघासाठीच नाव जवळपास निश्चित झाल्याचं कळून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानावर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नाशिक लोकसभा मतदारसंघाचा अखेर तोडगा निघण्याची शक्यता आहे. नाशिकच्या जागेवरून मध्यरात्री ३ वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानवर बैठक झाली. या बैठकीसाठी श्रीकांत शिंदे, हेमंत गोडसे, अजय बोरस्ते आणि इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत हेमंत गोडसे यांचं नाव निश्चित झालं असून त्यांना काम सुरु करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. शिंदे गटाचे अजय बोरस्ते हे देखील इच्छूक उमेदवारांपैकी एक होते.

छगन भुजबळांनी घेतलेल्या माघारीनंतर ही जागा शिंदे गटाला मिळेल असे म्हटले जात होते. परंतु शिंदे गटातही दोन भाग पडले होते. एकीकडे हेमंत गोडसे, यांनी अनेकवेळा मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलने देखील केली होती आणि दुसरीकडे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते हे देखील वारंवार मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेत होते. अखेर मुख्यमंत्र्यांना हा निर्माण झालेला तिढा सोडवण्यात यश आले असून नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी हेमंत गोडसे यांना देण्यात आली आहे. प्रचाराला कमी दिवस उरल्यामुळे अजय बोरस्ते यांना थांबवून गोडसेंना संधी दिल्याचं समोर येत आहे. गोडसेंना १० वर्षाचा अनुभव असून त्यांच्या प्रचाराचा पहिला टप्पा पार देखील झाल्याने त्यांना त्यांना उमेदवारी देण्यात अली आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीत स्पर्धा आणि वादविवाद चालू होते. नाव जाहीर होत नसल्याने छगन भुजबळ यांनी मतदार संघातून माघार घेतली आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी फक्त अंदाज वर्तवल्याने जागा वाटप रखडलेले होते. परंतु आता आज किंवा उद्या गोडसेंच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. दोन दिवसात नाव जाहीर करण्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर बाकी इच्छुक उमेदवारांची काय भूमिका राहणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

हे ही वाचा:

Kalyan-Dombivali करांची पाण्याची चणचण संपणार, नव्या धरणाची होणार निर्मिती !

प्रेग्नेंसी नंतर Alia Bhatt घेतेय ‘ही’ थेरपी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss