Friday, May 3, 2024

Latest Posts

Loksabha Election 2024 च्या पहिल्या टप्प्यात देशभरात झालं ‘फक्त’ इतके टक्के मतदान

देशभरात निवडणुकीचे (Election2024) वारे वाहत आहे. काल राज्यातील २१ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आहे. मतदान करून बऱ्याच नागरिकांनी आपला हक्क बजावला आहे.

देशभरात निवडणुकीचे (Loksabha Election 2024) वारे वाहत आहे. काल राज्यातील २१ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आहे. मतदान करून बऱ्याच नागरिकांनी आपला हक्क बजावला आहे. संपूर्ण देशात जवजवळ ६० टक्के मतदारांनी मतदान पार पाडलं. त्रिपुरा (Tripura) राज्यात सर्वाधिक मतदान झाले आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) ५५.२९ टक्के मतदान झालेलं आहे. बिहारमध्ये (Bihar) सर्वात कमी मतदान झालं असून ते ४७.४९ टक्के इतकं ते आहे. ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी १८ लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. संपूर्ण देशभरातील २१ राज्यांमधील १०२ मतदार संघात १६२५ उमेदवार रिंगणात आहेत.

काल महाराष्ट्रात ५ ठिकाणी म्हणजेच भंडारा-गोंदिया (Bhandara-Gondiya), चंद्रपूर(Chandrapur), गडचिरोली-चिमूर (Gadchiroli-Chimur), नागपूर (Nagpur) आणि रामटेक (Ramtek) येथे निवडणूक पार पडली. नागरिकांनी सकाळपासून लांबच-लांब रांगा मतदान केंद्राभोवती लावल्या होत्या. भंडारा-गोंदिया मध्ये ६४.०८ टक्के इतकं मतदान पार पडलं. चंद्रपूर मध्ये ६०.३५ टक्के इतकं मतदान पार पडलं असून गडचिरोली-चिमूर मध्ये ६९.४३ टक्के, नागपूर मध्ये ५४.४६ टक्के, रामटेक मध्ये ५९.५८ टक्के मतदान पार पडलं. सर्वात कमी मतदान नागपूर मध्ये तर सर्वात जास्त गडचिरोली-चिमूर येथे दिसून येत आहे.

मतदानाचा दुसरा टप्पा २६ एप्रिल रोजी पार पडेल. यात १३ राज्यांमधील ८९ संसदीय मतदारसंघांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यात ८ ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात मतदान होईल. यात बुलढाणा (Buldhana), अकोला (Akola), अमरावती (Amravati), यवतमाळ वाशीम (Yavatmal Washim), हिंगोली (Hingoli), वर्धा (Wardha), नांदेड (Nanded) आणि परभणी (Parbhani) या ठिकाणी मतदान पार पडेल. नागरिकांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.

 

हे ही वाचा:

घरात घुसून मारण्याची भाषा करणाऱ्या Narendra Modi ना चीन घरात घुसल्याचे कसे दिसत नाही? – Nana Patole

Aditya Thackeray यांना CM बनवून Devendra Fadnavis दिल्लीत जाणार होते, Uddhav Thackeray यांचा मोठा दावा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss