Thursday, May 16, 2024

Latest Posts

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी BJP चा जाहीरनामा प्रसिद्ध, PM Modi यांनी जाहीर केल्या ‘या’ नव्या योजना

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार, १४ एप्रिल) भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. ‘मोदी कि गॅरंटी भाजपचा संकल्प’ या नावाने हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात पंतप्रधान मोदी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या असून जाहीरनाम्यात रोजगाराच्या संधी, महिला सक्षमीकरण आणि शेतकरी आणि उद्योजकता यांच्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंतीनिमित्त आज भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजप मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला असून यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे अनेक बडे नेते उपस्थित होते. या जाहीरनाम्यात भाजपकडून आश्वासनांची खैरात करण्यात आली असून, जाहीरनाम्यात रोजगाराच्या संधी, महिला सक्षमीकरण आणि शेतकरी आणि उद्योजकता यांच्यावर विशेष भर देण्यात आला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले, “संपूर्ण देशाला भाजपच्या जाहीरनाम्याचा प्रतीक्षा असते. भाजपच्या जाहीरनाम्यात उद्योजकता आणि रोजगारावर भर देण्यात आला आहे. पुढील पाच वर्षांपर्यंत जनतेला मोफत राशन मिळेल. पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेण्यात येतील. जण औषाढ़ी योजनेचा विस्तार केला जाईल.”

पंतप्रधान मोदींनी केल्या या मोठ्या घोषणा

  • रोजगार आणि उद्योजकतेवर भर देण्यात येणार
  • पुढील पाच वर्षांपर्यंत मोफत रेशन योजना
  • आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पाच लाखांपर्यंत मोफत उपचार
  • ७० वर्षांवरील वृद्ध, तृतीयपंथीय यांना मिळणार आयुष्यमान भारत योजनेचा लाभ
  • गरिबांसाठी ३ कोटी घरांची निर्मिती
  • पाईपलाईन द्वारे स्वस्त गॅस घराघरात पोहचवणार
  • पीएम मोफत सूर्य घर योजना चालू करणार
  • देशात फूड प्रोसेसिंग हब बनवणार
  • महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न
  • ३ कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ करणार
  • महिला बचत गटांना माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य, पर्यटन या विषयांवर प्रशिक्षण देणार
  • मुद्रा योजना १० लाखांहून २० लाखांवर
  • देशात ३ नव्या बुलेट ट्रेन

हे ही वाचा:

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss