Thursday, May 9, 2024

Latest Posts

बारामतीत धमक्या देत असाल तर मुंबई आणि ठाण्यात यायचं; संजय राऊतांचा अजित पवारांना इशारा

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आज इंदापूरमधील मविआच्या (Mahavikas Aghadi) प्रचार सभेत संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले, तुम्हाला धमक्या नवीन असतील, आम्ही धमक्या देतो सुद्धा आणि घेतो सुध्दा. धमक्या आवाज बदलून दिल्या जातात. तुम्ही बारामतीत धमक्या देत असाल तर तुम्हाला मुंबईत यायचं आहे, ठाण्यात यायचं आहे, असा इशारा संजय राऊत यांनी अजित पवार यांना दिला आहे.

धमक्या द्यायच्या, पोलिसांचा वापर करायचा. आम्हाला माहित आहे आम्ही आयुष्यभर धमक्या देतच आलेलो आहोत. तुम्हाला धमक्या नवीन असतील, आम्ही धमक्या देतो सुद्धा आणि घेतो सुद्धा. धमक्या आवाज बदलून दिल्या जातात. तुम्ही बारामतीत धमक्या देत असाल तर तुम्हाला मुंबईत यायचं आहे, ठाण्यात यायचं आहे. ही मर्दांची सभा, नामर्द होते ते पळून गेले, तुम्ही तुमचा प्रचार करा आणि निवडून येऊन दाखवा. बारामतीची लढाई ही महाराष्ट्राची लढाई आहे. आताही प्रचाराची गरज नाही. बारामतीचे गुजरात करू पाहत असाल तर इथे शिवसेनेचा झेंडा असेल. धमक्या देऊन मत मागतात त्यांनी विकास केला नाही. देवेंद्र फडणवीस हे तुम्हा सगळ्यांचे नेते आहेत. ते म्हणाले मी पुन्हा आलो मी पुन्हा आलो दोन दोन पक्ष घेऊन आलो. काय हे क्वालिफिकेशन, लोक विकास करून येतात. मी त्यांना सांगतो चार महिन्यात सरकार बदललेले असेल. केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार नसेल. ईडी आणि सीबीआय आहेत. त्या काही दिवसांनी आमच्याकडे येणार आहेत. तुमचा पक्ष शिल्लक राहतो का ते बघा,असे म्हणत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले, आम्हाला बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे लोक जेव्हा उन्हात बसलेले असतील तेव्हा त्यांचा जास्त अंत पाहू नका. पण आपण इथे एका विचाराने बसलेले आहात, मला अन्नद आहे की, इंदापूरला सुप्रिया ताईंच्या प्रचारासाठी मला येता आले. एक गोष्ट इथे स्पष्ट दिसत आहे की, पायाखालची वाळू सरकली की माणूस दहशतवादाचा मार्ग स्वीकारतो. माणूस घाबरला, समोरचा पराभवाची भीती वाटायला लागली, लोकं आपल्याला स्वीकारणार नाहीत. त्याचे भय वाटायला लागले की, मोदींचा मार्ग सुरु होतो,असे संजय राऊत म्हणाले. हर्षवर्धन पाटील यांना शांत झोप लागत असेल तर तुम्ही महाराष्ट्राच्या मातीतील माणूस म्हणायच्या लायक नाहीत. हर्षवर्धन पाटील यांची अस्वस्थता जाणवते. या देशात दोन लोकांना झोप लागते. त्यांना गुजरातला पाठवू तिथे त्यांना शांत झोप लागेल. नाहीतर जिथे केजरीवाल आणि सोरेन किंवा आम्ही जिथे राहिले तिथं पाठवू त्यांना शांत झोप लागेल, असे संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

मराठवाड्यात शिंदेंच्या शिवसेनेला एकच जागा मिळणार, संभाजीनगरची जागा भाजपाकडे जाण्याची शक्यता

उद्धव ठाकरेंकडून अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीला लोकसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss