Thursday, May 16, 2024

Latest Posts

मुक्ता दाभोलकर यांच्या वकिलांचे मोठे विधान, नरेंद्र दाभोलकर यांच्या हल्लेखोरांच्या ‘हिटलिस्ट’वर अन्य महनीय व्यक्ती…

नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तत्कालीन कार्याध्यक्ष होते. २०१३ साली पुण्यामध्ये नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) यांच्यवर दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. दाभोलकर यांच्या हत्येने सगळीकडेच खळबळ माजली होती. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सुरुवातीला पुणे पोलीस करत होते पण दाभोलकर यांची कन्या मुक्ता दाभोलकर यांनी सीबीआय ने हा तपास करावा अशी मागणी न्यायालयाकडे याचिकेद्वारे केली. म्हणून नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास नंतर सीबीआयकडे देण्यात आला होता . सध्या या प्रकरणाचा तपास सुरूच आहे. नुकतच नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तपास खऱ्या अर्थाने पूर्ण झाला की नाही, याबाबत अंतिम भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश ‘सीबीआय’ला देऊन खंडपीठाने पुढील सुनावणी तीन आठवड्यांनी ठेवली.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तत्कालीन कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्यावर २०१३ साली पुण्यामध्ये दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. ही घटना २० ऑगस्ट २०१३ रोजी घडली होती. नरेंद्र दाभोलकर हे पुण्यामध्ये मॉर्निंग वॉक सदत्तगी घराबाहेर निघाले होते. तर त्यावेळेस दोन हल्लेखोरांनी संधी साधून दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या आणि त्यांची हत्या केली. या प्रकरणाची चौकशी पुणे पोलिसांनी केली होती. पुणे पोलिसांचा तपास समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आणून दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी याचिका केली. त्या याचिकेची दखल घेऊन उच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे सोपवला. त्यानंतर न्यायालयाने सीबीआयच्या तपासावर देखरेख ठेवून वेळोवेळी निर्देश दिले. ही याचिका अद्याप प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर, खटला सुरू झाला असल्याने उच्च न्यायालयाने आता देखरेख थांबवायला हवी, असे म्हणणे दोन आरोपींनी अर्जांद्वारे मांडले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सीबीआयकडे तपासाविषयी माहिती मागितली होती.

‘या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपपत्रे दाखल झाली आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाने देखरेख कायम ठेवल्यास त्याचे खटल्यावरही परिणाम होऊ शकतात,असे आरोपींच्या आणि सीबीआयच्या वकिलाने न्यायालयास सांगितले. तर मुक्ता दाभोलकर यांच्या वकिलांनी याचा विरोध करत ‘सीबीआयने तपास योग्य पद्धतीने केलेला नसून, अनेक त्रुटी ठेवल्या आहेत. हल्लेखोरांच्या ‘हिटलिस्ट’वर अन्य महनीय व्यक्तीही असल्याचे समोर आले असून, सर्व बाबी एकमेकांत गुंतलेल्या आहेत,’ असा दावा मुक्ता दाभोलकर यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर केला. तसेच त्यांनी मुक्त दाभोलकर यांच्या जीवाला धोका असल्याचेही सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा:

UNION BUDGET 2023, कोण व कसे करणार केंद्रीय अर्थसंकल्पाचे नियोजन ?

UNION BUDGET 2023, शिक्षकांच्या प्रशिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचं

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss