Wednesday, May 15, 2024

Latest Posts

UNION BUDGET 2023, शिक्षकांच्या प्रशिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचं

भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यासाठी काही तास बाकी आहेत.

भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यासाठी काही तास बाकी आहेत. जसजसा वेळ चालला आहे तसतसा उद्योगांकडून अपेक्षांची मागणी वाढत आहे. २०२२ मधील अर्थसंकल्प हा डिजिटल शिक्षण, डिजिटल विद्यापीठांची स्थापना, नोकऱ्यांची निर्मिती, कृषी विद्यापीठे, प्रोग्रमच्या कौशल्यावर सुधारणा यांच्याशी निगडित होता. शिक्षणाच्या विस्तारावर भर दिल्याने उद्योगधंद्यांनी या वर्षीच्या अर्थसंकल्पनेत काही प्रमुख मागण्यांचे खंडन दिले आहे ते पाहूया.

हे ही वाचा: Union Budget 2023-24 Live Updates, यंदाच्या बजेटची प्रत्येक लाईव्ह अपडेट घ्या जाणून…

शिक्षण क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे प्राथमिक क्षेत्र आहे. सादर होणारा २०२३ च्या अर्थसंकल्पाकडून दर्जेदार शिक्षणाचा पाय उभारण्यासाठी मोठ्या अपेक्षा आहेत. वर्गखोल्यांमध्ये तंत्रद्यानाचा समावेश करावा, शिक्षकांचे सक्षमीकरण करावे, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्या पाहिजेत, नवनवीन शोधांना प्रोक्षासन देणे आणि तरुणांना नवीन कौशल्य आणि पुनकौशल्य बनवणे यामुळे परिवर्तन होईल आणि भारतातील शिक्षण सर्वात प्रभावी पद्धतीने चालेल. या IC3 इन्स्टिट्यूट म्हणतात, NEP २०२० मध्ये नमूद केलेल्या बदलांची सुरवात या वर्षी शैक्षणिक क्षेत्रात केंद्रीय अर्थसंकल्पनात योग्य पद्धतीने होऊ शकतो. कोवीड-१९ च्या उद्रेकाने शैक्षणिक वातावरण ऑफलाईन वरून बदलले आणि ते ऑनलाईन वर आले. त्यामुळे अनेक शिक्षकांना परिस्थितीशी जुळवून घेणं कठीण होत होते. आधुनिक तंत्रध्यानामध्ये शिक्षणाने प्रशिक्षण देण्याची खूप गरज आहे.

भारत सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पना २०१९-२० मध्ये स्टडी इन इंडिया हा उपक्रम सुरु केला होता. याचा उद्धेश आंतरराष्टीय विद्यार्थ्यांना भारतीय उच्च शिक्षण संस्थांमध्ये अभ्यास करण्यासाठी आकर्षित करणे गरजेचे आहे. स्थानिक विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर ओळख करण्यासाठी अधिक संधी उपलब्ध करून देणं या उपक्रमाचा उद्देश आहे. म्हणून भारतातील शिक्षण वाढीला चालना दिली पाहिजे. अलीकडच्या वर्षात शिक्षण क्षेत्राने अनेक बदल बाबी वाढीव आर्थिक गुंतवणूकीच अनुभव घेणं गरजेचे आहे. त्यामध्ये देशाला ध्यानाच्या आश्रयस्थानात बदलण्याची क्षमता आहे. आगामी अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये सरकारने शैक्षणिक समानतेचा मानतेला प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

हे ही वाचा:

Budget 2023, अर्थसंकल्प २०२३ नवीन कर सवलतींसह मध्यमवर्गीय ‘आत्मनिर्भर’ बनतील का?

Budget 2023, २०२३-२४ ची अर्थसंकल्पना कोण सादर करणार? वेळ, तारीखसह जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss