Monday, May 6, 2024

Latest Posts

PUNE: उड्डाणपुलाच्या कामासाठी वाहतुकीत बदल

मेट्रो (METRO) साठीच्या उड्डाणपुलाचे काम चौकात सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यापीठ (UNIVERSITY) चौकातील वाहतुकीमध्ये शुक्रवारपासून अर्थात १० नोव्हेंबर बदल करण्यात आला आहे. औंधकडून शिवाजीनगरकडे येणाऱ्या दुचाकीचालकांना आता सकाळी आठ ते रात्री आठ दरम्यान मिलेनियम गेटमधून प्रवेश करून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडावे लागणार आहे. मेट्रोच्या उड्डाणपुलाचे काम होईपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. आचार्य आनंद ऋषी चौकातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SAVITRIBAI PHULE PUNE VIDYAPITH) येथील मेट्रोसाठीच्या उड्डाणपुलाचे काम चौकात सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यापीठ चौकातील वाहतुकीमध्ये आज, शुक्रवारपासून बदल करण्यात आला आहे. औंधकडून शिवाजीनगरकडे येणाऱ्या दुचाकीचालकांना आता सकाळी आठ ते रात्री आठ दरम्यान मिलेनियम गेटमधून प्रवेश करून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडावे लागणार आहे. मेट्रोच्या उड्डाणपुलाचे काम होईपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SAVITRIBAI PHULE PUNE VIDYAPITH) चौकामध्ये मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी मेट्रोचे खांब व उड्डाणपुलासाठीचे खांब उभारण्यासाठी रस्ता खोदई व बॅरिकेडींग करण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक शाखेचे उपायुक्त विजय मगर यांनी चौकातील वाहतूक बदलाचा आदेश काढला आहे. हा वाहतूक बदल विद्यापीठ चौकातील पुलाचे व मेट्रोचे बांधकाम संपेपर्यंत अंमलात राहणार असल्याचे पोलिसांनी आदेशात म्हटले आहे. औंधवरून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या दुचाकीचालकांनी मिलेनियम गेट चतुःश्रृंगी पोलिस ठाणे या ठिकाणाहून  विद्यापीठामध्ये प्रवेश करावा. मुख्य गेटमधून बाहरे पडावे. यासाठी दररोज सकाळी आठ ते रात्री आठ अशी वेळ ठरवण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या मिनी बस, बस, पीएमपी, खासगी बस यांनी मेट्रोकामाच्या डाव्या बाजूच्या लेनचा वापर करावा. तीनचाकी व चारचाकी वाहनचालकांनी उजव्या बाजूच्या लेनचा वापर करावा. अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा : 

“मराठी पोरी दुनियेला दाखवती माज…”, ‘झिम्मा २’ च्या गाण्यावर सिद्धार्थ-मितालीचा भन्नाट डान्स

दीपिका पदुकोणचा ‘Just Looking A Wow Video’ सोशल मीडियावर होतोय जबरदस्त व्हायरल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss