सध्या राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी या होत आहेत. अनेक नेतेमंडळी हे वरिष्ठांच्या भेट घेत आहेत. अश्यातच काळ रात्री राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. एकीकडे राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार हा होत नाहीय तर दुसरीकडे काल झालेल्या भेटीत शिवसेना आणि भाजपा एकत्र निवडणुका लढणार यावर शिक्कामोर्तब हा करण्यात आला आहे.
काल दिनांक ४ जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यातील कार्यक्रम आटोपून दिल्लीकडे रवाना झाले. तर दुसरीकदे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सायंकाळी नागपूरमधील कार्यक्रम आटोपून दिल्लीला रवाना झाले. रात्री १० वाजता दोन्ही नेत्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तिघांमध्ये दीड तासांहून अधिक वेळ चर्चा झाल्याची माहिती सकाळी समोर आली होती. आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपा एकत्र लढणार आहेत. यावर रविवारी रात्री झालेल्या अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तर नुकतंच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. या ट्विट मध्ये एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की,
काल, रविवारी रात्री मी आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी दिल्लीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री @AmitShah यांची भेट घेतली.
कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले… pic.twitter.com/MdLoqiPoy2
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 5, 2023
काल, रविवारी रात्री मी आणि उपमुख्यमंत्री
@Dev_Fadnavis
यांनी दिल्लीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री
@AmitShah
यांची भेट घेतली.
कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री श्री. शाह यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही ही भेट घेतली.
राज्यात आगामी सर्व निवडणूका (ज्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश होतो) शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या ११ महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे, रखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार….
हे ही वाचा :
World Test Championship Final मध्ये द मेन इन ब्लू भिडणार बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी
सुलोचना दीदींविषयी Raj Thackeray यांची भावनिक पोस्ट, म्हणाले…
Me Honar Super Star Jallosh Juniors चे विजेते शरयू आणि सई, पुन्हा एकदा Vaibhav Ghuge ने मारली बाजी