Thursday, May 9, 2024

Latest Posts

चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दानवेंनी दिली प्रतिक्रिया, मी खैरे यांचं…

आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली.

आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये एकूण १७ उमेदवारांची नावे आहेत. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency) चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या जागेसाठी अंबादास दानवे हे देखील इच्छुक होते. मात्र आज जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चंद्रकांत खैरे यांना सहाव्यांदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दानवे म्हणाले, मी खैरे यांचं नाही तर पक्षाचं काम करणार आहे, असे अंबादास दानवे म्हणाले. त्यांनी केलेल्या या विधानावरून खैरे दानवे वाद मिटला नसल्याचे चित्र दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या छत्रपती संभाजी नगरच्या जागेवरून काही दिवसांपूर्वी चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे असा वाद निर्माण झाला होता. हे दोन्ही नेते या जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यातच आज खैरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावर बोलताना दानवे म्हणाले, सर्वांची मते जाणून घेऊन ही यादी जाहीर करण्यात आली आहे. ही प्रभावी यादी आहे. पक्षप्रमुख जी काही बाबदारी देतील ती सर्व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. मी खैरे यांचं नाही तर पक्षाचं काम करणार आहे, असे अंबादास दानवे म्हणाले.

दरम्यान, पुढे यावर बोलताना दानवे म्हणाले, मी इच्छुक होतो २०१४,२०१९ आणि आताही माझी निवडणूक लढण्याची इच्छा होती. इच्छा असणे वावग नाहीं. मात्र, मला विरोधी पक्षनेते पदाची महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. आम्हाला हट्ट करण्याचा अधिकार आहे. निर्णय घेण्याचा अधिकार पक्ष प्रमुखाचा आहे. व्यक्तिगत हितापेक्षा संघटनेचे हीत महत्वाचं आहे. मी पक्ष प्रमुखांना आता फोन करून बोललो, तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे. चिंता नसावी जोमाने पक्षाचं काम करू असे त्यांना सांगितले आहे. इच्छा असतांना उमेदवारी मिळाली नसल्याने थोडफार वाईट वाटत असते. पण, जी जबाबदारी पक्षप्रमुख देतील ती पूर्ण करेल,असे अंबादास दानवे म्हणाले.

हे ही वाचा:

मोदी सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, Dhananjay Mahadik यांचा दावा

ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी जाहीर; कोण आहेत ठाकरेंचे १७ उमेदवार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss