Thursday, May 9, 2024

Latest Posts

जितेंद्र आव्हाडांची उदयनराजेंवर टीका, शाहू महाराजांचे योगदान…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर सर्वच पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर सर्वच पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहेत. त्यातच आता शरद पवार (Sharad Pawar) गटातील राष्ट्रवादाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad ) यांनी बोचरे विधान केले आहेत. जितेंद्र आव्हाड म्हणाले, आमच्या मनात कोल्हापूरची जागा खूपच जास्त जवळची आहे. शाहू महाराजांचे योगदान मोठं आहे.त्यांची परंपरा अजूनही कोल्हापूरकर मानतात. शाहू फुले यांचे विचार संविधानात आहेत. उदयनराजे काय करतायत??? एकेकाळी आम्ही त्यांना त्यांच्या घरी जाऊन उमेदवारी दिली होती. सध्या काय करतात याचं मला माहिती नाही. त्याचं ते बघतील. आम्हाला शाहू फुले आंबेडकर यांचे विचार महत्त्वाचे आहेत, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, पियुष गोयल यांचे चिरंजीव कांदिवलीतील एका कॉलेजमध्ये भाषण द्यायला गेले होते. तिथे विद्यार्थ्यांनी त्यांना विरोध केला. गुजरात आणि बिहारमध्ये आंदोलन सुरु केलं होतं. बिहार, गुजरातमधले सर्व विद्यार्थी रस्त्यावर आले होते. त्यानंतर इंदिरा गांधींना उतरती कळा लागली.विद्यार्थी रस्त्यावर येतात तेव्हा तेव्हा अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आज ठाकूर कॉलेजमधील विद्यार्थी पाहून आमच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना कळतंय जोर जबरदस्ती कशी सुरु आहे. हे देशाला मार्गदर्शन ठरेल जी विद्यार्थ्यांनी भूमिका घेतलेली आहे. जेव्हा केव्हा गरज लागेल तेव्हा आम्ही यायला तयार आहोत. त्यांच्यावर पोलीस केसेस करतील, मॅनेजमेंट त्रास देईल तेव्हा आम्ही त्यांच्या मागे राहू, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

काल आम्ही निवडणूक आयोगाला भेटलो. सगळ्यात महत्वाचा निवडणूक आयोग आहे. लोकशाहीला धरून प्रतिक्रिया द्यायला हव्यात मात्र असे काही होणार नाही. जनतेचा विश्वास आता उठत चालला आहे. एजन्सी एका विशिष्ट पक्षाला मदत करत राहिली तर कसं चालायचं? तुमच्या भूमिकेकडे देशातील सर्वांचं लक्ष आहे. निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने देखील प्रश्न उपस्थित केले. भारतीय लोकशाही आणि संसदीय लोकशाहीला बट्टा लावण्याचे हे काम आहे. विरोधी पक्षाला घाबरवण्याची वेगळी पद्धत सुरु झालीय. इलेक्शन कमिशन सरकारची कठपुतली आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

हे ही वाचा:

हा फक्त महाराजांचा अपमान नाही, तर…किरण मानेंच्या पोस्टने वेधले साऱ्यांचे लक्ष

कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट, कांद्यावरील निर्यातबंदी कायम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss