Karnataka निकालावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, जनतेने Narendra Modi आणि Amit Shah यांना झिडकारलं

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलत असताना ते म्हणाले आहेत की, कर्नाटकात काँग्रेसच सत्ता स्थापन करेल. काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळत आहे.

Karnataka निकालावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, जनतेने Narendra Modi आणि Amit Shah यांना झिडकारलं

Sanjay Raut On Karnataka Assembly Elections 2023 : आज कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा निकाल हा काही तासातासमोर आला आहे. पहिल्या अर्ध्या तासतात कर्नाटकाचे चित्र हे स्पष्ट झाले होते. काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर असल्याचे दिसून येत आहे तर काँग्रेस आघाडीवर असल्याचे दिसत आहे. कर्नाटकाच्या या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष हे लागले आहे. तसेच काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना बंगळुरुमध्ये हलवण्यात येणार आहे. कर्नाटकमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. त्यानंतर काँग्रेसमधील घडामोडींना वेग आला आहे. बहुमत न मिळाल्यास सर्व आमदारांना अज्ञातस्थळी हलवण्यात येणार आहे. या सर्व उमेदवारांना हैद्राबाद ला हलवण्यात येणार आहे असे देखील समोर आले आहे. तर रात्री ८ वाजता महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर या दरम्यान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टी वर जोरदार हल्लाबोल हा केला आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलत असताना ते म्हणाले आहेत की, कर्नाटकात काँग्रेसच सत्ता स्थापन करेल. काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळत आहे. कर्नाटकात काँग्रेसचा विजय होत आहे तर भाजपचा पराभव नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्री अमित शाह यांचा हा पराभव आहे. तसेच संजय राऊत पुढे म्हणाले आहेत की, कर्नाटकातून देशाची मन की बात बाहेर पडत आहे. कर्नाटकच्या जनतेनं पंतप्रधान मोदी आणि मंत्री अमित शाह यांनी झिडकारलं असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं.

अमित शाह अँड पंतप्रधान मोदी या दोन्ही नेत्यांनी हा पराभव आता स्वीकारला पाहिजे. कर्नाटकात या दोन्ही नेत्यांनी तळ ठोकला होता. प्रत्येक निवडणुकीत ते तंबू ठोकतात. राज्या राज्यातून भाजपच्या टोळ्या या कर्नाटकात खोके घेऊन आल्या होत्या. पण कर्नाटकातील जनता भाजपच्या दबावाला बळी पडली नाही. आता पराभव झाला तरी तोडफोड करून काही करता येते का ते भाजप पाहत आहे, असा आरोप त्यांनी केला.

तसेच पुढे संजय राऊत हे म्हणाले आहेत की, कर्नाटकात कोणतीच स्टोरी चालली नाही. फक्त लोकशाहीची स्टोरी चालली. बजरंग बलीची गदा त्यांच्या टाळक्यात पडली. कर्नाटकात श्रीराम आणि बजरंगबली सत्याच्या बाजूने आले. हा मोदी आणि शाह यांचा पराभव झाला. मोदींनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पराभव समोर आल्याने त्यांनी बजरंबलीला निवडणुकीत आणले. पण बजरंग बलीची गदा त्यांच्या टाळक्यात पडली, असा हल्लाच त्यांनी चढवला.

हे ही वाचा:

Karnataka मध्ये Congress बहुमताच्या उंबरठ्यावर, राहुल गांधींचे सूचक ट्विट होतंय व्हायरल

Karnataka Assembly election 2023 Result, पहिल्या अर्ध्या तासातच कर्नाटकातील चित्र स्पष्ट, काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर

Karnataka Assembly election 2023 Result, कर्नाटकात कुणाचा गुलाल उधळणार?, निकालाचं काऊंटडाऊन सुरू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version