Saturday, April 27, 2024

Latest Posts

Karnataka मध्ये Congress बहुमताच्या उंबरठ्यावर, राहुल गांधींचे सूचक ट्विट होतंय व्हायरल

कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा अखेर फैसला अवघ्या काही तासांवर आला आहे.

Karnataka Assembly election 2023 Result : कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा अखेर फैसला अवघ्या काही तासांवर आला आहे. अवघ्या पहिल्या अर्ध्या तासतात कर्नाटकाचे चित्र हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर असल्याचे दिसून येत आहे तर काँग्रेस आघाडीवर असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून एक सूचक ट्विट हे करण्यात आलं आहे.

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट करण्यात आले, ज्यामध्ये राहुल गांधी काँग्रेस नेत्यांसोबत दिसत आहेत. या ट्विटवर कॅप्शन देण्यात आले आहे की, मी अजिंक्य आहे, मला खूप विश्वास आहे. होय, आज मी थांबू शकत नाही.

 कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा फैसला अवघ्या काही तासांवर आला आहे. मतमोजणीला ८ वाजता सुरुवात झाली आहे. सुरुवातील हाती आलेल्या निकालासमोर काँग्रेस आघाडीवर आहे. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सूचक ट्विट केलं आहे. आज मी थांबू शकत नाही, असं ट्विटमध्ये म्हणत राहुल गांधी यांनी भाजपला इशारा दिला आहे. त्यांनी त्यांचा प्रचारादरम्यानचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, काँग्रेस ११६ जागांवर आघाडीवर आहे. कर्नाटक सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा ११३ इतका आहे. तसंच मतांच्या टक्केवारीतही काँग्रेस भाजपला मागे टाकेल, असं अंदाज आहे.

दिनांक १० मे रोजी कर्नाटकात मतदान हे मतदान झाले आहे. आज दिनांक १३ मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnataka Assembly Election Result 2023) निकाल हा लागणार आहे. आज सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सुरुवातीला टपाली मतमोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम मशीन उघडल्या जातील. आज साधारणतः दुपारी १२ वाजेपर्यंत निवडणुकीचे कल हाती येतील. तर बेळगावातील १८ मतदारसंघातील निकाल हे दुपारी दोन वाजेपर्यंत जाहीर होतील. त्यामुळे कर्नाटक कुणाच्या हाती जाणार? गुलाल कोण उधळणार? याचे चित्र स्पष्ट अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे. राज्यात मतदानासाठी ५८,५४५ मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. या निवडणुकीत २,६१५ उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये २,४३० पुरुष तर १८४ महिला उमेदवार आणि १ तृतीयपंथीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला ५.३१ कोटी मतदारांनी केला असून तो ईव्हीएम मशीनमध्ये बंद आहे. राज्यात ७३.१९ टक्के मतदान झालं. त्यामुळे सत्ताधारी भाजपची धाकधूक वाढली आहे.

हे ही वाचा:

Karnataka Assembly election 2023 Result, पहिल्या अर्ध्या तासातच कर्नाटकातील चित्र स्पष्ट, काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर

Karnataka Assembly election 2023 Result, कर्नाटकात कुणाचा गुलाल उधळणार?, निकालाचं काऊंटडाऊन सुरू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss