Thursday, May 9, 2024

Latest Posts

प्रकाश पोहरेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट, बंद दाराआड अर्धा तास चर्चा

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात युती होणार का? हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे. जागावाटपावरून चर्चा सुरु आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पण दुसरीकडे अजूनही महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. हे सर्व चालू असतानाच भाजपाचे खासदार संजय धोत्रे (Sanjay Dhotre) यांचे मेहुणे तथा अकोला जिल्ह्यातील शेतकरी नेते प्रकाश पोहरे (Prakash Pohare) यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.

अकोल्यातील यशवंत भवन या प्रकाश आंबेडकर यांच्या निवास्थानी जाऊन जाऊन प्रकाश पोहरे यांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा सुरु होती. त्यांच्यातील या चर्चेमुळे अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. मात्र अद्याप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीचा भाग झालेले नाही. असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश पोहरे यांच्या भेटीमुळे राजकारणात चर्चाना उधाण आले आहे. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यानंतर प्रकाश पोहरे यांनी प्रतिक्रिया दिली. प्रकाश पोहरे म्हणाले, आमची ही राजकीय भेट नव्हती. यातून कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे प्रकाश पोहरे म्हणाले. मी एका वृत्तपत्राचा संपादक असल्याने कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी मी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली, असे देखील त्यांनी सांगितले आहे.

मागील काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर महायुतीमध्ये सामील होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र अजूनही ते महायुतीमध्ये सामील झाले नाही. वेळ आलीच तर आम्ही एकट्याने निवडणूक लढवू, अशी भूमिका वंचितांच्या नेत्यांनी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील झाल्यास ठाकरे गटाला २०, काँग्रेसला १५, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला ९ आणि वंचितला ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर वंचितने आपली वेगळी चूल मांडल्यास ठाकरे गट २२ , काँग्रेस १६ आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष १० जागा मिळण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

स्वत:चा संस्कृतपणा बघा, मग मुख्यमंत्र्यांना बोला; शिवसेना प्रवक्ते आक्रमक

देशात पहिली निवडणूक कधी पार पडली? जाणून घ्या सविस्तर | Lok Sabha । Election

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss