Saturday, May 11, 2024

Latest Posts

Raj Thackeray Live : आत्ताचं सरकार ही सहकार चळवळ नाही, सहारा चळवळ

आज कर्जत मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेला संबोधित केले आहे.

यावेळी बोलत असताना राज ठाकरे म्हणले आहेत की आत्ताच सरकार आहे ती सहकार चळवळ नाही. ती सहारा चळवळ आहे. आज राज्यात २ लाख २२ हजारांवर सहकारी संस्था आहेत. सहकार चळवळ ही ज्योतिराव फुले यांनी सुरु केली आहे. तसेच राज ठाकरे पुढे म्हणाले आहेत की, महानंद डेअरी अमूल गिळंकृत करते कि काय अशी स्थिती तयार झाली आहे.

मराठवाड्यात ८००  ते ९०० फुटावरही पाणी लागत नाही. तर पुढच्या ४०-५० वर्षात मराठवाड्याचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही असं तज्ज्ञांचे म्हणणं आहे असं देखील राज ठाकरे म्हणाले आहे. तर उद्या या जमीचे वाळवंट झाल्यानंतर ती जमीन पुरवत आणायचे प्रयत्न केले तर ४००-५०० वर्ष लागतील. महाराष्ट्राचे जे जे चांगलं आहे ते बाहेर काढा आणि बाहेर निघत नसेल तर उध्वस्त करा असं सध्या चालू आहे. आज आम्ही जातीजातींतच भांडत आहोत. मराठी माणूस एकत्र राहू नये म्हणून हे बाहेरचे प्रयत्न करत आहेत. गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा आहे. जे महाराष्ट्रात चांगले आहे ते बाहेर काढा आणि जे बाहेर काढता येत नाही ते उद्धवस्त करा, असे बाहेरच्या लोकांचे धोरण आहे, असा दावा राज ठाकरे यांनी केलाय. जगभरात जेवढी युद्ध झाली त्यालाच आपण इतिहास म्हणून वाचतो. कोणताही इतिहास भूगोलाशिवाय पूर्ण होत नाही. युद्ध म्हणजे जमिन मिळवणे.

जे महाराष्ट्रात चांगले आहे ते बाहेर काढा आणि जे बाहेर काढता येत नाही ते उद्धवस्त करा, असे बाहेरच्या लोकांचे धोरण आहे, असा दावा राज ठाकरे यांनी केलाय. जगभरात जेवढी युद्ध झाली त्यालाच आपण इतिहास म्हणून वाचतो. कोणताही इतिहास भूगोलाशिवाय पूर्ण होत नाही. युद्ध म्हणजे जमिन मिळवणे. तसेच राज ठाकरे म्हणाले, माणसाला धंदा जमत नाही असे बोलतात पण असंख्य मराठी माणसे करोडोंचे व्यवसाय करतात पण गप्प असतात. शोबाजी करत नाही. जगातील प्रसिद्ध परफ्यूमचा अर्क हे ठाण्यातील केळकर बनवतात. आपली ताकद खुप मोठी आहे. राज्यात सहकार चळवळ उभी राहिली आहे. आताचे सरकार ही सहकार चळवळ नाही ती सहारा चळवळ आहे. महात्मा जोतीबा फुले यांनी सहकार चळवळ उभी केली. जमिनी श्रीमंताच्या घशात जावू नयेत म्हणून जोतीबांनी पहिले आंदोलन केले.

हे ही वाचा:

बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यास ३३ कोटी देवही तुम्हाला वाचवणार नाहीत: संजय राऊत

यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी परिधान करावा,जाणुन घ्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss