Sunday, May 5, 2024

Latest Posts

यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी परिधान करावा,जाणुन घ्या

यंदा मकर संक्रात 15 जानेवारीला साजरी केली जाणार आहे, पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशी प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव म्हणजे संक्रांत साजरी केली जाते.

यंदा मकर संक्रात 15 जानेवारीला साजरी केली जाणार आहे, पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशी प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव म्हणजे संक्रांत साजरी केली जाते या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते आणि या संक्रांतीपासूनच दिवस हा हळूहळू मोठा होत जातो कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान होता आणि रात्र मोठी होती पण मकर संक्रांतीनंतर दिवस हा हळूहळू मोठा होत जातो आणि रात्र ही छोटी होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान दानधर्म देवांचे दर्शन तप यांना विशेष महत्त्व असते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानले जात तसेच या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि खूप पुन्हा मिळते तसेच सूर्यदेवाचा आशीर्वाद ही प्राप्त होतो आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात तर अशा प्रकारे मकर संक्रांतीचे खूप महत्त्व आहे पण त्याबरोबरच स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी हळदी कुंकाला विशेष महत्त्व असते त्यामुळे हा एक सौभाग्यकारक सण म्हणला तरीही चालेल आणि त्याच स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये तर

रंग

आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्यसाधारण असे महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात आणि काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतिक मानलं जातात पण आपल्या हिंदू धर्मात काही चार-पाच रंग आहेत की ते खूप शुभ मानले गेले आहेत प्रत्येक कार्यासाठी किंवा देव कार्यासाठी हे रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग आहे तो हिरवा हिरवा रंग हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो कारण बघा नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते किंवा महिला लग्न झाल्यानंतर शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालतात कारण त्यामुळे त्यांच्या पतीचे आयुष्य वाढतं असे हिंदू धर्मशास्त्र सांगतो त्याबरोबरच हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रात ही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने मन शांत होते त्यामुळे हिरव्या रंगाचं खूप अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आपण देवीची ओटी भरताना सुद्धा बघा हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरवीच साडी घेतो त्यावरूनच हिरवा रंग हा किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला समजतं त्यामुळे शक्य झालं किंवा तुमच्याकडे असेल तर संक्रांतीला तुम्ही हिरव्या रंगाची साडी अवश्यनेचा नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रात लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो आम्हाला रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचं वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याबरोबरच माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याबरोबरच आपल्या सौभाग्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं कारण सौभाग्यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदीकुंकू त्यामधील कुंकाचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचे महत्त्व खूप आहे हा रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे शक्य असेल तर

तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडी सुद्धा नेसू शकता त्याने केसरी रंगाची साडी सुद्धा नेसू शकता हा केशरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथांचे ध्वज केशरी रंगाचे होते कारण केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता याचे प्रतीक आहे तसेच केशरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे केसरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते त्यानंतर पिवळा रंग आपल्या सिंधू धर्मात बघा पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हटलं जातं कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यात पिवळा रंग जास्त वापरला जातो तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्यदेव मंगल आणि बृहस्पती सारख्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात हे प्रकाश देखील दर्शवतात आणि पिवळा रंग परिधान केल्याने आपला गुरु ग्रह सुद्धा बलवान होतो तसेच सौभाग्यामधील दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद हळदीला जेवढं महत्त्व आपल्या हिंदू धर्मात आहेत तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगाला आहे त्यामुळे पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी सुद्धा तुम्ही संक्रांतीला नेसू शकता त्यानंतर सर्व स्त्री वर्गाच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी जवळपास प्रत्येक केला गुलाबी रंग हा आवडतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो तसेच हा रंग आनंदाचे प्रतीक सुद्धा मानला जातो गुलाबी रंग हा नेहमीच स्त्रियांना आकर्षित करतो श्री सवय काहीही असो तरी त्यांना गुलाबी रंग आवडतोच गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन सुद्धा खूप प्रसन्न होतं आणि वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते आणि गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतो आणि मन सुद्धा शांत राहतं त्यामुळे गुलाबी रंगाचं एक वेगळं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडी सुद्धा नेसू शकता

आता मी तुम्हाला जे काही रंग सांगितले ते शुभ रंग आहेत आणि संक्रांती दिवशी असा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे असे रंग बाहेरचे उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर रूपदार ठेवतात त्यामुळे शक्यतो तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करा थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात पण त्याबरोबरच तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर अशा रंगाच्या साड्या सुद्धा नेसू शकता या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकता मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही तर आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचा वस्त्र परिधान केलेला असत ती रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं म्हणजे ही पद्धत बघा पूर्वीपासून चालत आलेली आहे संक्रांत जवळ आले की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावरती आलेली आहे आणि आपण तो रंग पूर्णपणे वर्ज करत असतो पण यावर्षी म्हणजे 2024 ला यंदा संक्रांत काळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला काळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मात काळा रंग अशोक मानला जातो कोणत्याही देव कार्यात किंवा शुभकार्यात आपण काळा रंग वापरत नाही पण मकर संक्रांत हा एकमेव सण असा आहे की या दिवशी काळ्या रंगाची साडी ही आवर्जून घातली जाते पण यंदा संक्रांति देवीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेलं आहे त्यामुळे आपल्याला यावर्षी मकर संक्रांत 2024 मध्ये काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे कपडे घालता येणार नाही त्यामुळे चुकूनही हे रंग वापरू नका त्यानंतर बांगड्या बद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात 16 शृंगार मध्ये बांगड्यांचा समावेश असतो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मशास्त्रात बांगड्यांना सुद्धा खूप महत्त्व आहे आणि संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काठापदराच्या साड्या घालतात ओसायला जातात हळदीकुंकू करतात तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये दोन दोन तरी काचेच्या बांगड्या असल्याच पाहिजेत त्यातल्या त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्य प्राप्तीचे प्रत्येक मानला जातो आणि असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते म्हणजेच त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते असे हिंदू धर्मशास्त्र सांगते त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला आणि त्यातल्या त्यात बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातात सात अशा बांगड्या आपल्याला घालायचे आहेत हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत म्हणजे एका हातामध्ये आपल्याला एक बांगडी जास्त घालायची आहे आपण कसारा कडे गेल्यानंतर तो आपल्याला अशाच पद्धतीने बांगड्या भरतो पण तुम्ही घरच्या घरी घालणार असाल तर एका हातात म्हणजे मी उदाहरण दिलं तुम्ही यापेक्षा जास्त घालू शकता फक्त एका हातात एक बांगडी जास्त घाला आणि बांगड्या भरल्यानंतर संक्रांतीच्या वेळी त्यामधील लाखेचा चुडा घालतात बघा हातामध्ये सर्व सौभाग्यवती स्त्रिया लाखेचा चुडा घालतात त्याचं खूप अनन्य साधारण असं महत्त्व आहे त्यामुळे तुमच्या सुद्धा हातामध्ये लाखेचा चुडा असायलाच हवा तो फार काळ टिकत नाही पण संक्रांतीच्या एक दिवस जरी आपल्या हातामध्ये असला तरी पुरेसा आहे.

हे ही वाचा:

Raj Thackeray Live : आत्ताचं सरकार ही सहकार चळवळ नाही, सहारा चळवळ

भव्य नाट्ययात्रा आणि शिवराज्याभिषेक सोहळा,शंभराव्या नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्याचे खास आकर्षण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss