Friday, May 10, 2024

Latest Posts

शिवसेना नेते रामदास कदम यांनी सांगितलं उद्धवनीती कशी फसली?

शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे असा सल्ला कदम यांनी दिला.

मुंबई- टीम टाईम महाराष्ट्र : शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे असा सल्ला कदम यांनी दिला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी शिवसेना संपल्याचा आरोपही रामदास कदम यांनी केला आहे. रामदास कदम यांच्या म्हणण्यानुसार उद्धव ठाकरे यांनी कदम यांना आदेश दिले होते, कोणीही कितीही तुमच्यावरती किंवा पक्षावर टीका केली तरी, माध्यमां समोर येऊन त्यांना प्रत्युत्तर द्यायचे नाही याचे गणित अजूनही रामदास कदम यांना उघडलेले नाही असे त्यांनी सांगितले. नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी रामदास कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला.

‘टाईम महाराष्ट्र’ बरोबर बोलताना उद्धव ठाकरेंची उद्धवनीती कशी फसली? याबाबत कदम यांनी प्रतिक्रिया दिली, ” हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना नेत्यांचे पाठ थोपटायचे परंतु आता शिवसेनेत नेत्यांची हकालपट्टी होत आहे, नारायण राणे, गणेश नाईक, छगन भुजबळ, राज ठाकरे व एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडे पाठ फिरवली तेव्हा मी तटस्थपणे उभे राहिलो. परंतु आता ज्या पद्धतीने शिवसेनेत नेतेमंडळींना वागणूक दिली जात आहे यासाठी मी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करू इच्छितो” अशा खोचक शब्दात रामदास कदम यांनी ठाकरेंना टोला लगावला.

हेही वाचा : 

मनी लौडरिंग प्रकरणी सुजित पाटकरांची ईडी कडून तीन तास चौकशी

पुढे कदम म्हणाले,” ज्यावेळी महाविकास आघाडी बनत होती, त्यावेळी मी विरोध केला आणि शेवटी शरद पवार यांनी शिवसेनेचा एक कलमी कार्यक्रम केला. वित्तखाते राष्ट्रवादीने ओढून घेतल्यावर शिवसेनेचे मंत्री काढून त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मंत्रिपद दिले. अजित पवार यांनी प्रशासकीय अनुभवाचा फायदा घेत आपले स्वप्न साकार करण्याचे प्रयत्न केले. 40 आमदारांसह शिंदेने बंड केला एका अर्थी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाचवण्याचे काम केले याबद्दल मी त्यांचे कौतुक करू इच्छितो” असे रामदास कदम म्हणाले.

सध्या शिंदे गटातील बंडखोर आमदारांविरुद्ध कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे या संदर्भात कदमांना प्रश्न विचारले असता ते म्हणाले,”कोर्टाचा निकाल येणे अजून बाकी आहे. परंतु एका पक्षाचे हे दोन भाग जोडण्यासाठी उद्धवजींची इच्छा असेल तर मी प्रयत्न करेन. पण भविष्यात शिवसेनेचे पडलेले हे दोन भाग एकत्र येणे अवघड” असल्याचे कदम यांनी सांगितले. बंड केलेल्या आमदारांची पाठराखण करत रामदास कदम यांनी आमदारांविषयी उद्धव ठाकरेंनी केलेले वक्तव चुकीचं असल्याचं कदम यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या कामाची पद्धत पाहता शिवसेना बळकट करण्याचे निम्मे काम शिंदे यांनी केले असे रामदास कदम यांनी म्हटले. सध्याच्या राजकीय स्थिती वरती चर्चा न करणे हे मला योग्य ते वाटते. शिवसेना आणि भगवा झेंडा हा सदैव फडकत राहावा यासाठीच मी कायम प्रयत्न करत राहील असे रामदास कदम यांनी म्हटले.

लोणावळ्यात दोन वर्षाचा चिमुकल्याचा स्विमिंग पूल मध्ये बुडून मृत्यू

Latest Posts

Don't Miss