Amol kolhe यांच्याबरोबर घडलेल्या प्रकारावर सुप्रिया सुळेंनी केली नाराजी व्यक्त

छत्रपती संभाजी महाराजांवरील (Chhatrapati Sambhaji Maharaj) महानाट्याचे मोफत तिकीट (Free tickets ) दिले नाही म्हणून नाटक रोखण्याची धमकी दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तथा अभिनेते डॉ. अमोल कोल्हेंनी (Mp Amol kolhe) केला आहे.

Amol kolhe यांच्याबरोबर घडलेल्या प्रकारावर सुप्रिया सुळेंनी केली नाराजी व्यक्त

छत्रपती संभाजी महाराजांवरील (Chhatrapati Sambhaji Maharaj) महानाट्याचे मोफत तिकीट (Free tickets ) दिले नाही म्हणून नाटक रोखण्याची धमकी दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तथा अभिनेते डॉ. अमोल कोल्हेंनी (Mp Amol kolhe) केला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस (Pimpri-Chinchwad Police) दलातील काही पोलीस कर्मचाऱ्यांवर हा आरोप केला आहे. अमोल कोल्हे यांनी हा आरोप केला त्यानंतर आता विविध स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, छत्रपती संभाजी महाराज यांचा देदिप्यमान इतिहास शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत अतिशय प्रभावी पद्धतीने पोहोचविण्याचा प्रयत्न खासदार डॉ अमोल कोल्हे करीत आहेत. त्यांच्या या प्रयोगांना राज्यातील शिवप्रेमी जनता उदंड प्रतिसाद देत असताना पिंपरी चिंचवड येथील प्रयोगाच्या दरम्यान या महानाट्याच्या फुकट प्रवेशिकेसाठी येथील पोलिसांनी धमक्या दिल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र पोलीसांच्या उज्ज्वल प्रतिमेला काळीमा फासणारी ही घटना आहे. खासदार असणाऱ्या डॉ कोल्हे यांना अशा पद्धतीने धमकी दिली जाते ही अतिशय गंभीर बाब आहे. खासदारांना पोलीस अशी वागणूक देत असतील तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था असेल? राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची तातडीने याची दखल घेऊन पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे असे ट्विट करण्यात आले आहे.

हे ही वाचा : 

कोकण स्पेशिअल चमचमीत फणसाची भाजी माहीत आहे कशी बनवतात? जाणून घ्या आमच्या स्पेशिअल रेसिपी मधून!

न्यू स्टाईलमध्ये बनवा White Sauce Pasta

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version