Saturday, May 4, 2024

Latest Posts

Budget 2023 केंद्राच्या अर्थसंकल्प मोठ्या प्रमाणत रोजगारनिर्मिती करणार, देवेंद्र फडणवीस

आजचा दिवस हा भारतासाठी अत्यंत महत्वाचा होता. आज भारताचा संकल्प हा मांडण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेऊन अर्थसंकल्पावर भाष्य केलं आहे. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते, कारण मोदी सरकार २.० चा हा अखरेचा अर्थसंकल्प होता. त्यामुळे या अर्थसंकल्पातून सरकार गरीब, शेतकरी, मध्यमवर्गीय, व्यावसायिक इत्यादी समाजातील सर्वच घटकांना मोदी सरकार काय देणार, याची सर्वांना उत्सुकता होती. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांकडून टीका सुरू आहे, तर सत्ताधाऱ्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

दरम्यान, सीनिअर सिटीझन (Senior Citizen) अकाऊंट स्कीमची मर्यादा साडेचार लाखांवरून वाढवून ९ लाख रुपये करण्यात आली आहे. याचाच अर्थ ज्येष्ठ नागरिक या स्कीममध्ये कमाल ४.५ लाखांऐवजी ९ लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकतात. याशिवाय संयुक्त खात्यात कमाल रक्कम जमा करण्याची मर्यादा वाढवून ती १५ लाख रुपये करण्यात आल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली.अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा अमृत कालातील सर्वजन हिताय, या संकल्पनेवर आधारित अशाप्रकाराचा अर्थसंकल्प आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विचार करत असताना गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, उद्योजक आणि युवा अशा सगळ्या लोकांचा विचार या अर्थसंकल्पाने केला आहे.”

याचबरोबर “विशेषता पुढच्या २५ वर्षांमध्ये जो एक विकसित भारत आपण म्हणतोय. त्याच्याकडे जाण्याचा रस्ता या अर्थसंकल्पाने स्पष्टपणे दाखवला आहे. याला ग्रोथ बजेट म्हणता येईल, ग्रीन बजेट म्हणता येईल, याला पायाभूत सविधांचं बजेट म्हणता येईल, याला मध्यमवर्गीयांचं बजेट म्हणता येईल, याला शेवटच्या व्यक्तीचा विचार करणारं बजेट म्हणता येईल. अशा सर्व प्रकारच्या लोकांना या अर्थसंकल्पाच्या माध्यामातून मोठ्याप्रमाणात मदत मिळते आहे.” असंही फडणवीसांनी सांगितलं.

हे ही वाचा:

Union Budget 2023 KYC संदर्भात अर्थसंकल्पात करण्यात आली ही मोठी घोषणा, एकाच पोर्टलवर असणार संपूर्ण डेटा

UNION BUDGET2023, आज सादर झाला देशाचा अर्थसंकल्प, जाणून घ्या थोडक्यात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss