Saturday, May 4, 2024

Latest Posts

‘या’ खेळाडूने जिंकली भारताची लढत, १७ वर्षांत केली कामगिरी

सतरा वर्षांच्या ग्रँडमास्टर डी. गुकेश (D. Gukesh) याने इतिहास रचला आहे. डी. गुकेशने (D. Gukesh) ही स्पर्धा जिंकून सर्वात लहान आव्हानवीर होण्याचा मान मिळवला आहे. कॅंडिडेट्स स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा आणि डी.गुकेश यांच्यात बुद्धिबळाचा सामना झाला. हा सामना बरोबरीत सुटला पण सरस  गुणसंख्येच्या जोरावर डी. गुकेशने या स्पर्धेचा विजेता होण्याचा मान पटकावला आहे. कॅंडिडेट स्पर्धा जिंकल्यामुळे आता डी. गुकेश (D. Gukesh) चीनचा ग्रँडमास्टर डिंग लिरेन याला आव्हान देणार आहे. गुकेशने वयाच्या १७ व्या वर्षी ही स्पर्धा जिंकली आहे आणि यासोबतच रशियन बुद्धिबळपटू गॅरी याचा विक्रम त्यांनी मोडला आहे. १९८४ च्या कॅंडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत रशियन ग्रँड मास्टर गॅरी यांनी वयाच्या २२ व्या वर्षी ही स्पर्धा जिंकली होती.

विश्वनाथन आनंदने केले कौतुक 

जगविख्यात बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी ट्विटरच्या माध्यमातून डी. गुकेश (D. Gukesh) याचे अभिनंदन केले आहे. सर्वात लहान आव्हानवीर झाल्याबद्दल तुझे अभिनंदन. आम्हा सर्वांना तुझा अभिमान आहे. मला वैयक्तिकरित्या तू ज्याप्रकारे खेळलास आणि अवघड परिस्थिती ज्याप्रकारे हाताळलीस, त्या गोष्टीसाठी मला तुझा अभिमान वाटतो या क्षणाचा आनंद घे, अशा आशयाचे ट्विट विश्वनाथन आनंदने केले आहे.

…आणि गुकेश ठरला विजयी 

कॅंडिडेट्स स्पर्धेत प्रत्येक सामन्यासाठी खेळाडूला गुण दिले जातात. सामना जिंकला किंवा बरोबरीने सुटला तर त्यानुसार गुणांचे वाटप केले जाते. अंतिम गुणसंख्येनुसार डी. गुकेश (D. Gukesh) ला नऊ गुण मिळाले होते. त्यामुळेच ९ गुणांसह त्याने प्रथम स्थान पटकावले. या स्पर्धेचा विजेता डी. गुकेश ठरला आणि त्या पाठोपाठ नाकामुरा, कारूआना फेबियो इयान नेपोनियाच यांना ८.५ गुण मिळाले आणि ते संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानावर आले.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री जरी असलो, तरी एक बाप म्हणून मला अभिमान वाटतो- CM EKNATH SHINDE

महाराष्ट्रातील काही ठिकाणांना उष्णतेपासून दिलासा तर ठाण्याला Yellow Alert

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss