IPL2023 सारखाच राहणार का Ajinkya Rahaneचा पवित्रा?

नुकताच इंडियन प्रीमियर लीगचा सिझन पार पडला आहे आणि या मनोरंजक सीझनमध्ये भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी केली आहे त्यामधील काही फलंदाज आता इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सराव करत आहेत.

IPL2023 सारखाच राहणार का Ajinkya Rahaneचा पवित्रा?

नुकताच इंडियन प्रीमियर लीगचा सिझन पार पडला आहे आणि या मनोरंजक सीझनमध्ये भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी केली आहे त्यामधील काही फलंदाज आता इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सराव करत आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताने दुसऱ्यांदा धडक मारली आहे. पहिल्या पर्वामध्ये न्यूझीलंडमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे स्वप्न भंगले होते. आता पुन्हा एकदा भारताचा संघ जेतेपदासाठी सज्ज झाला आहे. दहा वर्षांपासून असलेला आयसीसी जेतेपदाचे दुष्काळ संपवण्याची संधी भारताने मिळवली आहे. या सामन्यामध्ये भारताचा दिग्गज फलंदाज अजिंक्य रहाणेला सहभागी करण्यात आले आहे. १८ महिन्यांनंतर रहाणेला खेळण्याची संधी मिळणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल होण्या आधी अजिंक्य राहणेने मोठे वक्तव्य केले आहे. अजिंक्य राहणेचा आक्रमक पवित्रा इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये पाहायला मिळाला. त्यामुळे त्याचा असाच अंदाज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पाहायला मिळाला तर त्याला रोखणं कठीण असल्याचं क्रीडाप्रेमींचे म्हणणे आहे. अजिंक्य रहाणेने सरावाच्या दरम्यान बीसीसीआयशी बोलताना सांगितले की, मी १८-१९ महिन्यांनंतर भारतीय संघामध्ये कमबॅक केलं आहे. जे काहि चांगलं वाईट असेल त्याचा मी विचार करत नाही. आता मी नव्याने सुरुवात करत आहे आता मी जे काही केलं ते मी आता कायम ठेवू इच्छित आहे असे अजिंक्य रहाणे म्हणाला.

इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये अजिंक्य रहाणेने दमदार कामगिरी केली आणि त्याने त्याचा पवित्रा दाखवला. आयपीएल २०२३ मध्ये त्याने एकूण १६ षटकार ठोकले आहेत. यंदाच्या सीझनमध्ये मी वैयक्तिकरित्या चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना पूर्ण आनंद घेतला. मी पूर्ण सिझनमध्ये चांगली फलंदाजी केली. आयपीएलमध्ये माझी कामगिरी चांगली राहिली आहे. त्याबाबत मला आनंद वाटत आहे. त्यामुळे पुनरागमन माझ्यासाठी भावनात्मक आहे. असे अजिंक्य रहाणेने यांच्या मुलाखतीमध्ये सांगितले.

हे ही वाचा:

Vat Pournima 2023: वटपौर्णिमेनिमित्त अशा पद्धतीने सजवा पूजेचे ताट

बीडमधून केली एका शेतकरी मुलाने गौतमीला लग्नाची मागणी

CSK vs GT, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा धोनीचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version