Friday, May 17, 2024

Latest Posts

मगरीने केली शिकार, या एका क्षणात जे झालं ते अगदी कल्पनेबाहेरच होतं

हरणांचा कळप पाणी पिण्यासाठी नदीवर गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसेल. पाणी प्यायल्यानंतर काही वेळ ते तिथेच उभे राहतात. पण इतक्या वेळात मगरीची नजर त्यांच्यावर पडते आणि ती हळूहळू त्यांच्या दिशेने सरकते.

मुंबई : सध्या सोशल मीडियावर काहीही अगदी छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या गोष्टीपर्यंत सगळ्या गोष्टी व्हायरल होताना दिसतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियातुन एका मगरीचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती हरणांना आपले शिकारबनवताना दिसतेए. हरणांचा कळप पाणी पिण्यासाठी नदीवर गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसेल. पाणी प्यायल्यानंतर काही वेळ ते तिथेचउभे राहतात. पण इतक्या वेळात मगरीची नजर त्यांच्यावर पडते आणि ती हळूहळू त्यांच्या दिशेने सरकते.

हेही वाचा :

विजय देवरकोंडाने वापरली नवी शिक्कल, LIGER सिनेमाच्या ट्रेलर लाँच वेळेस सगळ्यांना आश्चर्याचा धक्का

गुपचूप हल्ला :

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, याआधी हरणांचा कळप पाण्यात उभा राहून मजा करत होता. पण मगरीची त्यांच्यावर नजर पडली. आणि ती हळूच त्यांच्याजवळ येते आणि हरणाची मान पकडते. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे बाकीचे हरणे तिथून पळूनजातात. परंतु ज्याला मगरीने पकडले आहे तो हरीण काहीही करू शकत नाही आणि त्यामुळे मगर त्याची शिकार करते.

नदीत जाणे पडले महागात :

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला हरणांचे नदीवर जाणे किती धोकादायक ठरले हे कळले. त्यांच्या या चुकीमुळे त्यांना त्यांचा एक प्रियमित्र गमावावा लागतो. मगर पाण्याच्या आतून भक्ष्यावर लक्ष ठेवते. आणि संधी साधून त्यांचा गळा पकडते. यातही असेच दृश्य पाहायला मिळाले. हा व्हिडिओ wildmaofficial नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे.

Latest Posts

Don't Miss