Saturday, May 4, 2024

Latest Posts

Thailand Shooting: थायलंडमधील अंधाधुंद फायरिंगमुळे ३५ लोकांचा एकाचवेळी मृत्यू

यादरम्यान आरोपीचाही मृत्यू झाला. मृतांमध्ये २४ मुले आणि त्यांच्या दोन शिक्षकांचा समावेश आहे.

थायलंडमध्ये अंदाधुंद गोळीबारात ३५ जण ठार झाले आहेत. लहान मुलांच्या डे केअरवर झालेल्या हल्ल्याने लोक हादरले आहेत. दरम्यान, या हल्ल्यात अनेक मुलांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्यानंतर कुटुंबीयांची दुरवस्था झाली आहे. संपूर्ण थायलंडमध्ये शोककळा पसरली आहे. ताज्या माहितीनुसार, आरोपी हल्लेखोराने स्वत:वरही गोळी झाडली आहे. यादरम्यान आरोपीचाही मृत्यू झाला. मृतांमध्ये २४ मुले आणि त्यांच्या दोन शिक्षकांचा समावेश आहे.

माजी पोलीस अधिकारीच होता हल्लेखोर

या भीषण हल्ल्यातील आरोपींची ओळख पटली आहे. इतक्या निनिरपराध्यांची हत्या करणारा आरोपी ३४ वर्षीय माजी पोलिस कर्मचारी असून त्याचे नाव पन्या खमराब असे सांगितले जात आहे. या भयंकर घटनेबाबत एक मोठी बातमी अशीही समोर येत आहे की, आरोपीने जीव देण्यापूर्वी स्वतःची पत्नी आणि मुलावर गोळ्या झाडल्या. या प्रकरणाचा तपास आता अनेक बाजूंनी सुरू आहे.

या हृदयद्रावक घटनेत ३४ जणांचा मृत्यू झाल्याची स्थानिक प्रशासनाने पुष्टी केली आहे. स्थानिक पोलिसांचे प्रवक्ते आर्चॉन क्रायटॉन्ग यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले की, तपास सुरू आहे. हा हल्ला का आणि कशासाठी झाला, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे बाकी आहे. या हल्ल्यात प्रत्युत्तरादाखल एक पोलिसही शहीद झाला.

थायलंडच्या उत्तर-पूर्व प्रांतातील या हल्ल्याची जगभरात चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर लोक पीडितांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करत आहेत.

हे ही वाचा:

Cough Syrup: गांबियातील ६६ मुलांच्या मृत्यूमुळे WHO ने दिला ‘ या ‘ चार कफ सीरप्सबद्दल अलर्ट जारी…

IND vs SA 1st ODI: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, पहिल्या वनडे सामन्यावर पावसाचे संकट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss