Sunday, May 5, 2024

Latest Posts

Bigg Boss OTT Season २ ची प्रतीक्षा काही वेळातच संपणार

सध्या टेलिव्हिजनवरचा बहुचर्चित रिऍलिटी शो बिग बॉस हा चर्चेत आहे. मागील वर्षांपासून बिग बॉस ओटीटी सिझन १ आला होता.

सध्या टेलिव्हिजनवरचा बहुचर्चित रिऍलिटी शो बिग बॉस हा चर्चेत आहे. मागील वर्षांपासून बिग बॉस ओटीटी सिझन १ आला होता. या बिग बॉस ओटीटी सिझन १ ला प्रेक्षकांची प्रचंड प्रसिद्धी मिळाली. बिग बॉसचा सिझन दिव्या अग्रवाल हिने हा सिझन गाजवला. बिग बॉस ओटीटी सिझन २ चे हे नवे पर्व सलमान खान होस्ट करणार आहे. बिग बॉसच्या चाहत्यांना शोमध्ये होस्ट म्हणून सलमान खानची कामगिरी खूप आवडते. बिग बॉस ओटीटी सिझन २ प्रेक्षकांना २४ तास पाहायला मिळणार आहे. हा शो जिओ सिनेमावर मोफत पाहायला मिळणार आहे. आज १७ जून रोजी हा शो रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

१५ जून रोजी बिग बॉस ओटीटी सिझन २ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खानने शोच्या शोच्या प्रमोशनसाठी डबल-डेकर बसमध्ये भव्य प्रवेश केला आणि त्याने मीडियाशी थोडक्यात संवाद साधला आहे. पत्रकार परिषदेमध्ये सलमान खान म्हणाला की, ‘मैं ओटीटी पे भी कुछ ऐसा होने नहीं दूंगा जो संस्कृती के खिलाफ है मला वाटते की ओटीटीवर मार्गदर्शक तत्त्वे देखील लागू करण्यात आली आहेत. ज्यामुळे सामग्रीत सुधारणा झाली” असे सलमान खान म्हणाला. या नव्या पर्वामध्ये बरेच मोठे चेहरे दिसणार आहेत. नुसताच या कार्यक्रमाचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि त्यामध्ये सनी लिओनी, एम सी स्टॅन त्याचबरोबर अनेक मोठे पत्रकार या पहिल्याच भागामध्ये दिसणार आहेत. शोमध्ये पहिल्याच दिवशी पत्रकार स्पर्धकांना कडवट प्रश्न विचारणार आहेत.

बिग बॉस ओटीटी सिझन २ चे स्पर्धक –

अविनाश सचदेव
पुनीत सुपरस्टार
सायरस ब्रोचा
अभिषेक मल्हान (फुकरा इन्सान)
जाद हदीद
बेबीका धुर्वे
आकांशा पुरी
फलक नाझ
मनीषा राणी
जिया शंकर
पलक पुरास्वानी
आलिया सिद्दीकी

Latest Posts

Don't Miss