Friday, May 17, 2024

Latest Posts

Union Budget 2023, ‘या’ अर्थमंत्र्यांनी सर्वाधिक अर्थसंकल्प केले सादर, घ्या जाणून

दरवर्षी सरकारद्वारे वित्तीय वर्षांतील सरकारचे अंदाजे खर्च व उत्पन्न यांची सर्व माहिती व त्याचबरोबर गतवर्षांच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा सादर केला जातो. म्हणजेच देशाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात वर्षभराच्या खर्चाचा आणि उत्पन्नाचा हिशोब सरकारकडून जनतेसमोर मांडला जातो. यालाच अर्थसंकल्प असे म्हंटले जाते. हा सर्वसाधारण अर्थसंकल्प देशाच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून लोकसभेत सादर केले जाते. त्याच प्रमाणे या वर्षी १ फेब्रुवारी २०२३ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील.भारताच्या स्वातंत्र्यानंतर दरवर्षी अर्थसंकल्प सादर केला जातो . सर्वाधिक वेळा कोणत्या अर्थमंत्र्याने हे अर्थसंकल्प सादर केले हे तुम्हाला माहित आहे का? आता आम्ही तुम्हाला या संदर्भात एक खास माहिती देणार आहोत.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर दरवर्षी अर्थसंकल्पाचे सादरीकरण सरकारद्वारे केलं जात. पण सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम हा भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी केला आहे. भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थमंत्री मोरारजी देसाई (Morarji Desai) यांनी संसदेत तब्बल १० वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये ८ पूर्ण अर्थसंकल्प तर दोन अंतरिम असे अर्थसंकल्प होते. मोरारजी देसाई यांनी अर्थमंत्री म्हणून १९५९-६० ते १९६३-६४ या पाच वर्षांच्या कालावधीत त्यांनी पाच वेळा अर्थसंकल्प सादर केला होते. आणि नंतर १९६२-६३ या काळात अंतरिम अर्थसंकल्प सादर केले. दुसऱ्यांदा ते केंद्रीय अर्थमंत्री झाल्यावर १९६७ – ६८ ते १९६९ – ७० या काळात त्यांनी बजेट सादर केले. १९६७ – ६८ या काळात त्यांनी एक अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होते .

मोरारजी देसाई यांच्यानंतर सर्वाधिक अर्थसंकल्प सादरीकरणाच्या बाबतीत प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee), पी. चिंदबरम (P. Chidambaram), यशवंत सिन्हा (Yashwant Sinha), यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) आणि चिंतामणराव देशमूख (chintamanrao deshmukh) यांचा क्रमांक लागतो. या सगळ्यांनी आतापर्यंत प्रत्येकी सात वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे.तसेच तर मनमोहन सिंह (Manmohan Singh) आणि टी. टी. कृष्णमचारी (T. T. Krishnamachari) यांनी प्रत्येकी ६ वेळा अर्थसंकल्प मांडला आहे.

हे ही वाचा:

MPSCकडून मेगा भरती घोषणा, तब्बल इतक्या पदांसाठी होणार भरती

डीजीसीएने केली मोठी कारवाई, एअर इंडियाला ३० लाखांचा दंड तर पायलटचा परवानाही केला रद्द

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss