Sunday, May 12, 2024

Latest Posts

मृत्यूच्या खोट्या बातमीनंतर पूनम पांडे पहिल्यांदाच दिसली बाहेर,घेतले देवाचे दर्शन

बॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे ही गेल्या काही दिवसांत तिच्या मृत्यूच्या खोट्या कारणांमुळे चांगीलीच चर्चेत आली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे ही गेल्या काही दिवसांत तिच्या मृत्यूच्या खोट्या कारणांमुळे चांगीलीच चर्चेत आली आहे. पूनमनं स्वताच्या मृत्यूची खोटी बातमी सोशल मीडियावर व्हायरल केली होती.त्यानंतर तिला नेटकऱ्यांनी चांगलचं ट्रोल केलं आहे.प्रसिद्धीसाठी लोकं कोणत्याही थराला जाण्यासाठी आपली मर्यादा सोडतील असा पद्धतीत नेटकऱ्यांनी तिला सुनावले आहे.

पूनमनं जरी सोशल मीडियावर व्हिडिओ शेयर करत आपण जिवंत असल्याचे जाहीर केले असले तरी ती नेटकऱ्यांच्या टीकेचा विषय ठरली. त्यामुळे तिला वेगवेगळ्या प्रतिक्रियांना सामोरं जावं लागल्याचे दिसून आले आहे. सर्व्हिकल कॅन्सर सारख्या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी आपण हे सारं केल्याचे तिचे म्हणणे होते. हे करण्यामागचा माझा हेतू अगदी निख्खळ होता. पण माझ्या नावाचा वापर करुन दुसऱ्यांनीच त्यांचे प्रमोशन करुन घेतले. असा आरोप तिनं केला होता.

इंस्टावर पूनमनं आपण खरं सत्य काय असे म्हणत अनेक पोस्ट शेयर केल्या होत्या. त्यात तिनं कुणाचे नाव न घेता तिला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोडउत्तर दिले होते.या सगळ्या चर्चा सुरु असतानाच,पुनमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.यात ती पहिल्यांदाच तिच्या त्या बातमीनंतर स्पॉट झाली आहे. ती देवदर्शनाला निघाल्याचा तो व्हिडिओ असून त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ट्रॅडिशनल लूक मध्ये पूनमच्या व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओला नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंटस मिळाल्या आहेत. त्यावरून नेटकरी अजूनही तिच्यावर कमालीचे नाराज असल्याचे दिसून आले आहे.पूनम तू जे काही केले आहेस त्याला माफी देता येणार नाही. अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.

व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमध्ये पूनम देवदर्शनाला गेल्याचे दिसते. आयएनएसच्या एका रिपोर्टनुसार पूनम पांडेनं सर्व्हिकल कॅन्सरच्या नावाखाली आपल्या मृत्यूच्या बातमीचे प्रमोशन करत मुंबईतील अंधेरीमध्ये असणाऱ्या लक्ष्मी नारायण मंदिरात दर्शन घेतल्याचे म्हटले आहे.पुनम संपुर्ण पारंपरिक वेशामध्ये दिसुन येत आहे,तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान करत हातात पुजाची थाळी घेऊन ती देवदर्शनाला जात असल्याचं दिसून येत आहे,पुनमचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.तिच्या व्हिडिओवर नेटकरी अनेक प्रतिक्रिया देत आहेत.

हे ही वाचा:

‘ठरलं तर मग’ मालिकेतअर्जुन आणि चैतन्यच्या मैत्रीत फूट पाडण्याचा साक्षीचा डाव यशस्वी

विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी Amit Thackeray यांचा धडक मोर्चा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss