Wednesday, May 1, 2024

Latest Posts

प्रत्येक भारतीय Adipurusha पाहणार, चित्रपटाचे तिकीट फक्त ११२ रुपये

बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करणारा आणि वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आदिपुरुष हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे.

बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करणारा आणि वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आदिपुरुष हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननच्या (Kriti Sanon) ‘आदिपुरुष’ (Adipurush) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. एकीकडे या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला परंतु या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मात्र या चित्रपटाने चांगलाच गल्ला जमवला आहे. ओपनिंग डे आणि ओपनिंग वीकेंडला या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केल्याचं समोर आलं आहे. आदिपुरुष हा चित्रपट रिलीज होण्याआधीच या चित्रपटाची चित्रपट प्रेमींना उत्सुकता लागली होती.

अनेक प्रेक्षकांनी या चित्रपटाची ऍडव्हान्समध्ये तिकिटे बुक केली होती. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर ८६.७५ कोटींची कमाई केली होती. तर जगभरात ओपनिंग डेला १०० कोटींचा गल्ला जमवला होता.तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ६५.२५ कोटी, तिसऱ्या दिवशी ६९.१ कोटी, चौथ्या दिवशी १६ कोटी, पाचव्या दिवशी १०.७ कोटी, सहाव्या दिवशी ७.२५ कोटी, सातव्या कोटी ४.८५ कोटी, आठव्या दिवशी ३.४ कोटी, नवव्या दिवशी ५.२५ कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या वीकेंडला अर्थात रिलीजच्या दहाव्या दिवशी या सिनेमाने सहा कोटींचा गल्ला जमवला आहे. एकंदरीत या सिनेमाने रिलीजच्या दहा दिवसांत २७४.५५ कोटींची कमाई केली आहे.

आदिपुरुष या चित्रपट १६ जून २०२३ रोजी चित्रपटगुहांमध्ये प्रदर्शित झाला आहे आणि हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटामधील संवाद, वीएफएक्स अशा काही गोष्टींवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. ५०० कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेला हा चित्रपट लवकरच ३०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. आदिपुरुष’ चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी निर्मात्यांनी आता या चित्रपटाचं तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रेक्षकांना फक्त ११२ रुपयांमध्ये पाहायला मिळणार आहे. आता प्रत्येक भारतीय आदिपुरुष पाहणार, असं म्हणत तिकीट दर कमी केल्याची घोषणा केली आहे.

हे ही वाचा:

घरच्या घरी वापरली जाणारी मोहरी ठरते Bad Cholesterol वरील रामबाण उपाय

शाहिद कपूरचा ‘ब्लडी डॅडी’ चित्रपट थिएटरमध्ये नाही दाखवणार ; निर्मात्यांनी कारण सांगितले ….

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीसांचे भ्रष्ट सरकार उखडून टाका व काँग्रेसची सत्ता आणा, सिद्धरामय्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss