Saturday, May 4, 2024

Latest Posts

Prabhas च्या ‘Project K’ मध्ये ‘या’ सुपरस्टारची एन्ट्री, मानधन ऐकून तुम्हाला सुद्धा बसेल धक्का!

दाक्षिणात्य ऍक्टर प्रभासच्या आगामी 'प्रोजेक्ट के' या चित्रपटाबद्दल सर्वत्रच चर्चा रंगली आहे. 'प्रोजेक्ट के' (Project K) च्या घोषणेपासूनच या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

दाक्षिणात्य ऍक्टर प्रभासच्या आगामी ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाबद्दल सर्वत्रच चर्चा रंगली आहे. ‘प्रोजेक्ट के’ (Project K) च्या घोषणेपासूनच या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. या सिनेमात मोठी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. नुकत्याच आलेल्या अधिकृत माहिती नुसार या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन सुद्धा झळकणार आहे. कमल हसन (Kamal Hasan) यांनी भारतीय चित्रपट सृष्टीला अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. नुकतेच ‘आयफा२०२३’ (IIFA 2023) मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.

दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन (Kamal Hasan) नेहमी आपल्या चाहत्यांना काही तरी नवीन सप्राईझ देत असतात. या वेळेस सुद्धा ते आपल्या चाहत्यांना एक मोठी भेट देण्यास सज्ज झाले आहेत. प्रभास (Prabhas) च्या ‘प्रोजेक्ट के’ (Project K) मध्ये आता कमल हसन सुद्धा झळकणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. या शिवाय त्यांनी ‘प्रोजेक्ट के’ (Project K) या चित्रपटासाठी तब्बल १५० कोटी रुपयांचे मानधन घेतले आहे. तसेच या सिनेमाच्या शूटिंगसाठी त्यांनी २० दिवस दिल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे २० दिवसांसाठी तब्ब्ल १५० कोटी घेतल्याने सर्वत्र याची विशेष चर्चा होत आहे.

‘प्रोजेक्ट के’ (‘Project K’) या सिनेमात कमल हसन (Kamal Hasan) खलनायकाची भूमिका साकारणार आहेत. तसेच बॉलिवूडमधील मोठ-मोठे कलाकार सुद्धा या सिनेमात झळकणार आहेत. बॉलिवूडमधील बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन (Amitabh bacchan) तसेच अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सुद्धा आपल्याला ‘प्रोजेक्ट के’ (‘Project K’) या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. ‘प्रोजेक्ट के’ (‘Project K’) या सिनेमाच ७० टक्के शूटिंग पूर्ण झालं आहे. या सिनेमाची निर्मिती अश्विनी दत्त यांनी केली असून नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच या सिनेमात ग्राफिक्सचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार आहे असे सुद्धा अश्विनी दत्त म्हणाल्या आहेत.

दाक्षिणात्य स्टार प्रभासचा बहुचर्चित ‘प्रोजेक्ट के’ (‘Project K’) हा सिनेमा १२ जानेवारी २०२४ रोजी मकरसंक्रातीच्या शुभ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच नाग अश्विनने (Nag Ashwin) या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. प्रभास, दीपिका आणि कमल अशी भन्नाट सुपर स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे.

हे ही वाचा:

Sakshi Murder Case, भयानक हत्याकांड, हत्येनंतर आरोपीने काय केलं ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Coconut Water Face Spray ने करा नियमित Skin Care, त्वचा ही उजळेल…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss