Sunday, May 12, 2024

Latest Posts

विशाल निकमसोबत ‘येड लागलं प्रेमाचं’ या नव्या मालिकेत दिसणार जय दुधाणे,मालिकेचा प्रोमो झाला आउट

सध्या छोट्या पडद्यावर नवनव्या मालिकांची पर्वणीच पाहायला मिळत आहे.वेगवेगळ्या कथा मांडणाऱ्या नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

सध्या छोट्या पडद्यावर नवनव्या मालिकांची पर्वणीच पाहायला मिळत आहे.वेगवेगळ्या कथा मांडणाऱ्या नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.अशातच आता प्रेमा भोवती फिरणारी येड लागलं प्रेमाचं ही नवी कोरी मालिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तर या मालिकेतून बिग बॉस मधून आपली ओळख निर्माण करणारा अभिनेता टेलिव्हिजन विश्वात आपलं पदार्पण करत आहेया मालिकेतून अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता विशाल निकम मुख्य भूमिकेत साकारणार आहेत,आणि याचंबरोबर ही नवी जोडी प्रेक्षकांच्य भेटीला येत आहे.. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकही उस्तुक झाले आहेत. विशाल या मालिकेत रायाच्या भूमिकेत दिसणार आहे तर पूजा ही मंजिरीच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत नीना कुलकर्णी, आतिशा नाईक हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.तर सोबतच या मालिकेत ‘बिग बॉस मराठी ३’ फेम जय दुधाणेदेखील दिसणार आहे.

मराठी टीव्ही इन्फो या इंस्टाग्राम पेजवर ही माहिती शेअर करण्यात आली आहे. विशाल आणि पूजा यांच्यासोबत जय देखील या मालिकेत असणार आहे. आता या प्रोमोवर नेटकरी मालिकेची कथा सांगत आहेत. सोबतच जयची मालिकेतील नेमकी काय भूमिका काय असणार आहे याचाही अंदाज नेटकऱ्यांनी लावला आहे. त्यातच ही मालिका ‘मेहेंदी हैं रचनेवाली’ या हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचं सांगण्यात येत आहे.. तर जय हा पूजाच्या नवऱ्याची भूमिका साकारणार आहे. ज्याचा लग्नानंतर मृत्यू होतो. त्यानंतर पूजा ही सासरीच राहते. त्यानंतर विशाल आणि पूजा यांची कहाणी दाखवण्यात येणार आहे. आता नेटकऱ्यांनी लावलेला अंदाज हा खरा आहे की नाही हे मालिका चालू झाल्यावरचं समजु शकतो.मात्र या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांची उस्तुकत्ता शिगेला पोहचवली आहे हे नक्की.

घरोघरी मातीच्या चुली ही मालिका संध्याकाळी ७.३० वाजता तर साधी माणसं ही मालिका संध्याकाळी ७ वाजता प्रक्षेपित केली जाणार आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेली आई कुठे काय करते या मालिकेला वाहिनीचा दुपारचा स्लॉट देण्यात आलाय. तसेच ७ वाजता लागणारी कुन्या राजाची गं तु राणी या मालिकेचा शनिवार १६ मार्च रोजी शेवटचा भाग प्रदर्शित करण्यात आला. ही मालिका कधी सुरू होणार याची नेमकी तारीख प्रेक्षकांसमोर आलेली नाही. सोबतच या मालिकेसाठी स्टार प्रवाहावरील कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याबद्दलही कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

हे ही वाचा:

शहनाज गिलचा जंपसूटमधील स्टनिंग लूक,नवे फोटोशूट

महाविकास आघडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग, हिंदू बंधू-भगिनींनो म्हणायला जीभ कचरली का? एकनाथ शिंदेनी साधला ठाकरेंवर निशाणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss