Saturday, April 27, 2024

Latest Posts

शहनाज गिलचा जंपसूटमधील स्टनिंग लूक,नवे फोटोशूट

बॉलीवूड अभिनेत्री शहनाज गिल ही तिच्या लूक आणि फॅशनमुळे कायम चर्चेत येत असते.

बॉलीवूड अभिनेत्री शहनाज गिल ही तिच्या लूक आणि फॅशनमुळे कायम चर्चेत येत असते.शहनाज गिलही सोशल मीडियावर कायम सक्रीय असते,ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

सध्या मुंबईत लॅक्मे फॅशन वीकचे आयोजन करण्यात येत असते.या आयोजित कार्यक्रमात बॉलीवूडमधील अनेक ग्लॅमरस अभिनेत्री आपल्या सौंदर्याने आणि लूकने घायाळ करतात.
तर यावेळी सलमान खानच्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये आपलं नशीब आजमवण्यासाठी आलेली शहनाज गिल सहभागी झाली होती.शहनाजने हिंदी बिग बॉस देखील चांगलच गाजवल होत.
लॅक्मे फॅशन वीकच्या पाचव्या दिवशी अभिनेत्री शहनाज गिल जंपसूटमधील एका स्टनिंग लूकमध्ये दिसली आणि शोस्टॉपर देखील बनली.

 

यावेळी तिनेडिझायनर दीक्षा खन्नासाठी रॅम्प वॉक केला.’असिमेट्रिकल प्रिसिजन’ नावाच्या कलेक्शनमध्ये शेहनाज निळ्या रंगाच्या जंपसूटमध्ये दिसली.
तिने स्टायलिश राखाडी आणि निळ्या रंगाचा जंपसूट घातला होता. शहनाजने जंपसूटवर डेनिम जॅकेटही घातले होते, ज्यामुळे हा जंपसूट आणखी स्टायलिश दिसत होता.शहनाज गिलने तिच्या वेस्टर्न आउटफिटसह बोल्ड मेकअप केला होता आणि वेट हेअर लूक देऊन तिचे केस खुले ठेवले होते.
शहनाज गिलची किलर रॅम्प वॉक शैली चाहत्यांना खूप आवडते.शहनाज गिलने रॅम्पवर तिच्या किलर लूकने सर्वांची मने जिंकली.
शहनाज गिलच्या लूकमधील एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधले, ते म्हणजे तिने नाकाच्या मध्यभागी नॉज रिंग घातली. दरम्यान तिचा हा खास लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला.

 

Latest Posts

Don't Miss