Sunday, May 5, 2024

Latest Posts

लतादीदींचा स्वर म्हणजे आत्म्याला परमात्म्याशी जोडणारी तार – Amitabh Bachchan

भारतरत्न लता मंगेशकर यांचा स्वर हा आत्म्याला परमात्म्याशी जोडणारी तार आहे. त्यांचा आवाज ऐकल्यावर आत्म्याला परमात्म्याशी जोडले गेले आहे याची जाणीव ऐकणा-याला नक्की होते. तसंच लता मंगेशकर यांचा स्वर म्हणजे जणू मधाची धार आहे. मी माझ्या वडिलांना म्हणजेच हरिवंशराय बच्चन यांना एकदा विचारलं होतं की, लतादीदींच्या सुरांचं वर्णन कसं कराल? तर ते म्हणाले होते की, लतादीदींचा स्वर म्हणजे जणू मधाची धार. जशी मधाची धार तुटत नाही. त्याप्रमाणे लतादीदींच्या स्वरही कधी तुटला नाही, अशा शब्दात बीग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या भावना ‘लता मंगेशकर पुरस्कार’ स्वीकारताना व्यक्त केल्या.

८२ व्या मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृतीदीन सोहळ्यामध्ये अमिताभ बच्चन यांना तिसरा लता मंगेशकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. हा सोहळा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहामध्ये दणक्यात पार पडला. या सोहळ्यात साहित्य, संगीत, नाट्य, चित्रपट, वैद्यकीय तसंच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या प्रतिभावान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यावेळी लता मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन यांना उषा मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी अमिताभ बच्चन यांनी ‘आकाशाची सावली’ ही स्वरचित मराठी कविता सादर करून लता मंगेशकर यांना  आदरांजली वाहली. ‘रणरणत्या उन्हात आकाशाची सावली मला लाभली, त्या आकाशाचे नाव लता मंगेशकर यांनी  माझ्या कवितेत लता  स्वर, आणि संगीताचा परिचय होता. हीच संगीताची परिभाषा आणि संगीताची व्याख्या होती.

लता मंगेशकर म्हणजेच संगीत आणि संगीत म्हणजेच लता दीदी…माझ्या कवितेला समानार्थी शब्द आहेत दोन्ही गोष्टी…’ अशा शब्दात बिग बींनी लता मंगेशकर यांचं वर्णन केलं. मास्टर दिनानाथ स्मृती प्रतिष्ठान आणि हृदयेश आर्ट्स यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. होतं. यावेळी संगीत क्षेत्रातीली प्रदीर्घ सेवेसाठी संगीतकार ए. आर. रेहमान यांना गौरविण्यात आलं. नाट्य चित्रपट सेवेसाठी अशोक सराफ यांना तर अभिनेता रणदीप हुडा यांना सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मितीसाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार देण्यात आला. तसंच उत्कृष्ट नाट्य निर्मितीसाठी ‘गालिब’ या नाटकासाठी मोहन वाघ पुरस्कार अभिनेता चिन्मय मांडलेकर यांना देण्यात आला. तर नाट्य सेवेसाठी अतुल परचुरे यांना तर चित्रपट सेवेसाठी पद्मिनी कोल्हापूरे यांना गौरविण्यात आलं. आभार, और मेरा सौभाग्य लता जी के नाम पे पुरस्कार.. अशा आशयाची पोस्ट अमिताभ बच्चन यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून केली आहे.

हे ही वाचा:

PM Modi यांच्यामुळे आपला देश अर्थव्यवस्थांमध्ये…काय म्हणाले Dr. Shrikant Shinde?

इतका संघर्षमय होता ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा प्रवास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss