Wednesday, May 1, 2024

Latest Posts

“माझी ड्रॅगन क्वीन” बॉयफ्रेंड अनिश जोगने वाढदिवशी शेअर केला, सई ताम्हणकरचा खास विडिओ

राठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व आघाडीची अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हिला ओळखले जाते. सईने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक चाहत्यांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली. सई ही मूळची सांगली या गावाची असून कॉलेजपासूनच तिने अनेक एकांकिका व नाटकांमध्ये भाग घेतला.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व आघाडीची अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हिला ओळखले जाते. सईने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक चाहत्यांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली. सई ही मूळची सांगली या गावाची असून कॉलेजपासूनच तिने अनेक एकांकिका व नाटकांमध्ये भाग घेतला. मराठी चित्रपटसृष्टीतही तिने अनेक भूमिका साकारल्या. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या दुनियादारी या चित्रपटाच्या यशाने सईला मराठी चित्रपटसृष्टीत नवी ओळख मिळवून दिली. गेल्या काही वर्षांपासून तिने मराठीतच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतदेखील स्वतःची वेगळी ओळख बनवली आहे. आज २५ जून रोजी सई ताम्हणकरचा ३७ वा वाढदिवस आहे. त्यातच सध्या सई बॉयफ्रेंड अनिश जोगबरोबर स्पेन (spain) फिरायला गेलेली आहे.

बॉयफ्रेंड अनिश जोगने सोशल मीडियावर सईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक खास विडिओ इंस्टाग्रामवर (instagram) शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये (caption) अनिशने लिहिले आहे की, “माझ्या ड्रॅगन क्वीनला (dragan queen) वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू माझ्या हृदयाची आणि संपूर्ण जगाची राणी आहेस. तुला या जगातील सर्व आनंद मिळो. लव्ह यू Dracarys!!” सईचे स्पेन ट्रिपचे सर्व फोटो एकत्र करून अनिशने तिच्या वाढदिवशी हा खास व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये सई रडताना, हसताना, स्पेनमधील विविध ठिकाणांना भेट देताना दिसत आहे. या व्हिडीओला त्याने “फिर ले आया दिल…” हे रोमॅंटिक गाणे लावले आहे.

अनीशने इंस्टाग्रामवर (instagramशेअर केलेल्या या सईच्या व्हिडिओला असंख्य चाहत्यांनी कंमेंट (comment) करत शुभेच्छा दिल्या आहेत. अनिश जोग आणि सई ताम्हणकर एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखत असून दोघांनीही अनेकदा वेगवेगळ्या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. ‘गर्लफ्रेंड’, ‘धुरळा’, YZ, ‘टाइम प्लीज’ अशा अनेक चित्रपटांचा अनिश निर्माता आहे.

हे ही वाचा:

शाहिद कपूरचा ‘ब्लडी डॅडी’ चित्रपट थिएटरमध्ये नाही दाखवणार ; निर्मात्यांनी कारण सांगितले ….

मुंबईमध्ये ईडीचे १५ ठिकाणी छापे, संजय राऊत यांच्या मित्रावर गुन्हा दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss