Wednesday, May 1, 2024

Latest Posts

राजपाल यादवने केला त्याच्या पहिली पत्नीबद्दल खुलासा

अभिनेता राजपाल यादवने त्याच्या विनोदी भूमिकांनी आणि विनोदच्या अचूक टायमिंगने नेहमीच त्याच्या चाहत्याने त्याने खेळखळून खळखळून हसवलं आहे.

अभिनेता राजपाल यादवने त्याच्या विनोदी भूमिकांनी आणि विनोदच्या अचूक टायमिंगने नेहमीच त्याच्या चाहत्याने त्याने खेळखळून खळखळून हसवलं आहे. आतापर्यंतच्या करिअरमध्ये राजपालने अनेक मजेशीर भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटामध्ये त्याच्या अनेक भूमिकांनी त्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा केली आहे. मोठ्या पडद्यावर जरी तो कॉमेडी भूमिका साकारत असला तरी खासगी आयुष्यात त्याला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने पहिल्या पत्नीविषयी खुलासा केला आहे. अवघ्या २० व्या वर्षीच राजपालने त्याच्या पहिल्या पत्नीला गमावलं होतं. राजपालचे त्याच्या लहान वयामध्ये त्याचे लग्न झाले होते.

दिलेल्या मुलाखतीमध्ये राजपालने सांगितलं की लहान वयातच त्याचं लग्न झालं होतं. “त्याकाळी जर तुम्ही २० वर्षांचे असाल आणि तुमच्याकडे चांगली नोकरी असेल तर लग्नासाठी लगेच स्थळं यायची. त्यामुळे वयाच्या २० व्या वर्षीच वडिलांनी माझं लग्न लावून दिले होते. माझ्या पहिल्या पत्नीने मुलीला जन्म दिला आणि डिलिव्हरीनंतर तिचं निधन झालं. दुसऱ्या दिवशी मी तिला रुग्णालयात भेटायला जाणार होतो पण त्याऐवजी मी तिचं पार्थिव माझ्या खांद्यावर उचललं होतं. सुदैवाने माझ्या कुटुंबीयांनी, आईने आणि वहिनींनी माझ्या मुलीची खूप चांगल्याप्रकारे काळजी घेतली. तिला आईची कमतरता त्यांनी भासू दिली नाही. १९९१ मध्ये पहिल्या पत्नीच्या निधनानंतर राजपालने अभिनय क्षेत्रात आपला जम बसवला.”, असं राजपालने सांगितलं.

त्यांनतर राजपाल यादवने त्याच्या दुसऱ्या पत्नीबद्दल बोलताना म्हणाला, “मी माझ्या पत्नीला कधीच साडी नेसण्याची सक्ती केली नाही. मी माझ्या आईशी ज्याप्रकारे बोलतो, तीसुद्धा त्यांच्याशी तशीच बोलते. तिने आमची भाषा शिकून घेतली. एकेदिवशी जेव्हा मी गावी गेलो, तेव्हा मला ती पदराने चेहरा झाकलेली दिसली. कारण गावी महिला तशाच राहतात. होळी आणि दिवाळीनिमित्त ती गावी आवर्जून भेट देते आणि तिला पाच भाषा बोलता येतात याचा अंदाजही कोणी लावू शकत नाही. माझे गुरू आणि आईवडिलांनंतर तिनेच माझी खूप साथ दिली. माझ्या मुलीवर तिने सख्ख्या आईसारखं प्रेम केलं.” असे राजपाल यादवने सांगितले.

हे ही वाचा:

घरच्या घरी वापरली जाणारी मोहरी ठरते Bad Cholesterol वरील रामबाण उपाय

शाहिद कपूरचा ‘ब्लडी डॅडी’ चित्रपट थिएटरमध्ये नाही दाखवणार ; निर्मात्यांनी कारण सांगितले ….

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीसांचे भ्रष्ट सरकार उखडून टाका व काँग्रेसची सत्ता आणा, सिद्धरामय्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss