Monday, May 6, 2024

Latest Posts

Shruti Haasanने केला नात्याचा खुलासा

श्रुती हसन (Shruti Haasan) ही एक तामिळ भारतीय अभिनेत्री आणि गायिका आहे. सालार या चित्रपटांनी तिला प्रसिद्धी मिळवून दिली होती. सुपरस्टार कमल हसन (Kamal Haasan) यांची ती मुलगी आहे. पण श्रुती सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. श्रुती हसन आणि शंतनू हजारिका (Shantanu Hazarika) अनेक दिवसांपासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होते. मात्र मागील काही महिन्यांपासून ते वेगळे राहत आहेत. श्रुती आणि शंतनू यांच ब्रेकअप झाल आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असायची. पण, सध्या सोशल मीडियावर पण ती ऍक्टिव्ह नाही. शंतनू आणि श्रुतीने एकमेकांना सोशल मीडियावरून अनफॉलो पण केले आहे. त्याचबरोबर दोघांनी एकमेकांचे सोबत असलेले फोटो पण काढून टाकले आहेत.

एका मुलाखती दरम्यान श्रुतीने रिलेशनशिपवर मत मांडले होते. तुम्हाला जर एका नात्यामध्ये आनंद मिळत असेल तर ते तुमच्यासाठी चांगल आहे. पण मला असं वाटत की जोडीदाराला स्वतंत्र हव असेल तर ते देणं गरजेच आहे. या सगळ्या गोष्टीचा असा अर्थ नाही की तुम्ही त्याला गृहीत धराल. माझ्या बाबतीत असल्या काही गोष्टी झाल्या तर ते मला नाही चालणार. मी नांत्यामध्ये खूप प्रामाणिक आणि इमानदारी आहे. त्यामुळे मला असाच जोडीदार हवा आहे. तुम्ही जर असे नसाल तर माझी काहीच हरकत नाही असे तिने म्हटले आहे.

श्रुती हसन अभिनेता मायकेल कॉर्सेलला (Michael Corsell) डेट करत होती. त्यांनतर २०२० मध्ये शंतनू आणि श्रुती रिलेशनशिपमध्ये आले. रेडिट हे एक अमेरिकन सामाजिक बातम्या एकत्रीकरण सोशल मीडिया नेटवर्क आहे. त्या प्लॅटफॉर्मवर एका चाहत्याने प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचं उत्तर देताना शंतनूचा नवरा म्हणून उल्लेख केला होता.

हे ही वाचा:

बाप-लेक झळकणार एकाच चित्रपटात, कोणती भूमिका साकारणार?

ताऱ्यासारखे दिसणाऱ्या फळाचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss