Monday, May 6, 2024

Latest Posts

बाप-लेक झळकणार एकाच चित्रपटात, कोणती भूमिका साकारणार?

बॉलीवूड कलाकारांची मुलं कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता लेकीच्या प्रसिद्धीसाठी शाहरुख खान (Shah Rukh Khan) मुलगीसोबत एका नवीन चित्रपटात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी सुहाना खानचा (Suhana Khan) ‘आर्चीज’ चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटाला नेगेटिव्ह प्रतिक्रिया मिळाल्यामुळे आता शाहरुख खान स्वतः सुहानासोबत काम करणार आहे. शाहरुख खान आता या चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

शाहरुख आणि सुहाना  दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि सुजॉय घोष यांच्यासोबत काम करणार आहेत. शाहरुख खानला पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहे. सुहानाचे चित्रपटसृष्टीमध्ये करियर होण्यासाठी शाहरुख खान खूप मेहनत करत आहे. या चित्रपटात सुहाना शिष्याच्या भूमिकेत आणि शाहरुख खान गुरुच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी शाहरुख खानने पूर्णपणे लुक बदलला आहे. लाँग हेअरस्टाईल आणि छोट्या दाढीमध्ये तो दिसणार आहे. शाहरुखची ग्रे शेड्सची व्यक्तिरेखा या लुकवर चांगली दिसणार आहे. हा चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हे ही वाचा:

कच्च्या केळीचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Prajakta Mali म्हणतेय ‘कर्ज फेडायला करावं लागतं बाबा’, कारण काय?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss