Thursday, May 2, 2024

Latest Posts

म्हणून मी मुल न होऊ द्यायचा निर्णय घेतला, ‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा

अभिनेत्री प्रार्थना बेहरे महाराष्ट्रातील लोकप्रिय अभिनेत्रींमधील एक आहे. तिचा चाहतावर्ग पण खूप मोठा आहे. चित्रपटांबरोबर ती सोशल मीडियावर पण तितकीच ऍक्टिव्ह असते. प्रार्थनाने एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. मराठीबरोबर हिंदी मालिकेत पण काम प्रार्थना करते. सध्या प्रार्थना वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

सध्या सुरु असलेल्या ‘दिल के करीब’ या कार्यक्रमात प्रार्थनाने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिने मुलं का नको यावर सांगितलं आहे आणि मुंबई का सोडली यावर तिने तिचं मत मांडलं आहे. प्रार्थना आता वर्ष झालं अलिबाग येथे राहायला गेली आहे. तिच्या घरी भरपूर पाळीव प्राणी आहेत. तिच्या नवऱ्याला पण प्राण्यांची फार आवड आहे असे तिने सांगितले. त्यामुळे त्यांनी मुलं न होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्याकडे खूप प्राणी आहेत, त्यांची आम्ही मुलांप्रमाणे काळजी घेतो, असेही प्रार्थनाने सांगितले आहे. प्रार्थना अलिबागला राहण्याचं कारण म्हणजे अलिबागला आमची जागा आहे. कोविडच्या आधी आम्ही अलिबाग येथे जागा घेतली होती. त्यामुळे ती जागा डेव्हलप करायचा निर्णय घेतला. मुंबई ते अलिबाग प्रवास करणं सोपं आहे. तिथे घोडे, गाई, कुत्रे असं सगळं आहे. माझ्या नवऱ्याला आठवड्यातून ४ ते ५ वेळा ये-जा करावी लागते. जोपर्यंत मालिकेचे शुटींग चालू होते, तोपर्यंत मी मुंबईतच होते. परंतु इथे प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे आणि गर्दी पण आहे, असे तिने म्हटले आहे.

मला अलिबागला राहायला खूप आवडायचं तिथले हिरवीगार झाडे, मोठी जागा मी तिथे गेल्यावर तिथली होऊन जायची. मी तिथे मला आवडतात त्या सर्व गोष्टी करायची. म्हणून मला वाटलं की इथे जाऊन राहायचं. अलिबागला राहण्यासाठी माझे सासू – सासरे पण तयार आहेत. सुरुवातीला थोडा त्रास झाला पण आता आम्हाला सवय झाली आहे असे देखील तिने सांगितले आहे.

हे ही वाचा:

उन्हाळयात बनवा आंबट गोड कैरीचे वरण आंब्याची कुल्फी तर खूप आवडते पण बनवायची कशी?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss