Thursday, May 2, 2024

Latest Posts

चित्रपट हिट करण्यासाठी या नायकाने केली सगळी नौटंकी, व्हिडिओमुळे झाला Troll

कार्तिक आर्यनचा 'सत्य प्रेम की कथा ' हा चित्रपट लवकरच रिलिज (release)होणार असून सध्या हा चित्रपट खूप चर्चेत आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत अभिनेता कार्तिक आर्यन व त्याच्यासोबत अभिनेत्री कियारा अडवाणी दिसणार आहे. दरम्यान दोघेही चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये बिझी असून सध्या कार्तिक आर्यन सोशल मीडियावर (social media) खूप ट्रोल होत आहे.

कार्तिक आर्यनचा ‘सत्य प्रेम की कथा ‘ हा चित्रपट लवकरच रिलिज (release)होणार असून सध्या हा चित्रपट खूप चर्चेत आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत अभिनेता कार्तिक आर्यन व त्याच्यासोबत अभिनेत्री कियारा अडवाणी दिसणार आहे. दरम्यान दोघेही चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये बिझी असून सध्या कार्तिक आर्यन सोशल मीडियावर (social media) खूप ट्रोल होत आहे. अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या एका व्हिडियोमुळे ट्रॉल (troll) होत असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो इंडिगो एअरलाइनच्या इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करताना दिसत आहे. या फ्लाइटमध्ये काढलेला कार्तिकचा विडिओ तो मुंबईत येण्यापूर्वीच व्हायरल झाला होता. “व्हायरल भयानी” (viral bhayani) या नामी इंस्टाग्राम अकाउंट (instagram account) असणाऱ्या पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता.

कार्तिकचा हा व्हिडिओ खूप जास्त व्हायरल झाला असून चाहत्यांनी या व्हिडिओवर कंमेंट करत कार्तिकचे कौतुक केले आहे तसेच काहींनी कार्तिकला यासाठी ट्रोलही केले आहे. तर नेटकऱ्यांनी त्याला तो पब्लिसिटी स्टंट (publicity stunt) करत असल्याच म्हटले आहे.बहूतेक त्याचा नवीन चित्रपट रिलीज होणार आहे असं एकानं लिहिले आहे. तर ‘सिनेमाच्या प्रमोशनसाठी आता हाच मार्ग शिल्लक राहिला आहे’ असे एकाने लिहिले आहे. आता चित्रपट येत असल्याने तो ही नौटंकी करत आहे असेही एकाने या व्हिडियोच्या कंमेंट्समध्ये लिहिले आहे .अशा अनेक कमेंट करत आर्यनला ट्रोल केले जात आहे.यातच कार्तिकच्या चाह त्यानी त्याला पाठिंबा देत त्याची बाजू घेतली आहे,तो नेहमीच इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करतो असे एकाने लिहिले आहे तर कार्तिक खुप down to earth आहे असे दुसऱ्याने लिहिले आहे.

दरम्यान कार्तिक आर्यनचा ‘सत्य प्रेम की कथा ‘ हा चित्रपट २९ जूनला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार असून लवकरच प्रेक्षकांना हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांची जोडी प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळणार आहे. सध्या या चित्रपटवरूनही वाद चालूच आहेत.या चित्रपटात पाकिस्तानी गाणं ‘पसुरी’ (pasoori )या गाण्याचं रिमेक करण्यात आलं आहे ज्यामुळे प्रेक्षक नाराज झाले असून त्यांनी या गाण्याला विरोध केला आहे.

हे ही वाचा:

Sri Lanka विरुद्ध Pakistan कसोटी सामन्यामध्ये मिळाले २१ वर्षीय खेळाडूला स्थान

संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss