Monday, May 20, 2024

Latest Posts

यंदा गणेशोत्सवनिम्मित भारतातील प्रसिद्ध गणपती मंदिरांना द्या नक्की भेट

गणपती बाप्पा हे सर्वांचेच लाडके दैवत आहेत. त्याच्या आगमनाची तयारी कितीतरी दिवस आधीपासून सुरू होते. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन आता काही दिवसावर येऊन ठेपल आहे.

गणपती बाप्पा हे सर्वांचेच लाडके दैवत आहेत. त्याच्या आगमनाची तयारी कितीतरी दिवस आधीपासून सुरू होते. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन आता काही दिवसावर येऊन ठेपल आहे. गणेश चतुर्थीचा उत्सव केवळ भारतातच नाही तर जगभरात पाहायला मिळतो. यंदाच्या गणेश उत्सवात तुम्ही भारतातच नाही तर देशातील प्रसिद्ध मंदिर पाहायला मिळतील. यंदाच्या गणेश चतुर्थीला तुम्ही भारतातील काही प्रसिद्ध आणि प्राचीन गणेश मंदिरांना भेट देऊ शकता. या निमित्ताने आपण देशातील सर्वात प्रसिद्ध अशी १० मंदिराविषयी जाणुन घेऊया.

सिद्धिविनायक मंदिर, मुंबई –

मुंबईतील प्रसिद्ध मंदिर म्हणजे सिद्धीविनायक हे आहे. सिद्धिविनायक मंदिर हे प्रत्येक गणेश भक्ताच श्रद्धास्थान आहे. अगदी सामान्य माणसांपासून मोठमोठ्या कलाकारापर्यंत अनेकजण सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येतात. सिद्धिविनायक मंदिर १८ व्या शतकांमध्ये बांधले गेले आहे. हे मंदिर मुंबईतील सर्वात श्रीमंत मंदिर आहे. सिद्धिविनायक मंदिराला ‘नवसाचा गणपती’ असंही म्हटलं जाते. लक्ष्मण विठु पाटील आणि देऊबाई पाटील या दाम्पत्याने सिद्धीविनायक मंदिर उभारण्यासाठी निधी दिली होती. या मंदिरात देश-विदेशातून अनेक लोक नवस करण्यासाठी येतात.

दगडूशेठ हलवाई गणपती, पुणे –

दगडूशेठ गणपतीला शतकाहून अधिक काळाचा इतिहास आहे. या मंदिरातील बाप्पांची मूर्ती ही ७.५ फूट उंच आणि ४ फूट रुंद असून ती सुमारे ८ किलो सोन्याने सजलेली आहे. १८०० च्या उत्तरार्धात प्रसिद्ध मिठाई विक्रेते आणि एक श्रीमंत व्यापारी असलेले दगडूशेठ गडवे यांनी प्लेगच्या साथीने आपला मुलगा गमावला. यामुळे दगडूशेठ आणि त्यांची पत्नी दुःखात होते. नैराश्यातून मुक्त होण्यासाठी त्यांचे गुरू श्री. माधवनाथ महाराज यांनी त्यांना गणेश मंदिर बांधण्यास सांगितलं होत. त्याप्रमाणे १८९३ मध्ये मंदिराचं बांधकाम पूर्ण झाले. लोकमान्य टिळक हे दगडूशेठ गडवे यांचे जवळचे मित्र होते आणि तिथेच गणेशोत्सव साजरा करण्याची कल्पना टिळकांच्या मनात आली. त्यानंतर पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिर खूप प्रसिद्ध झाला.

सिध्दीविनायक महागणपती, टिटवाळा –

सिद्धिविनायक महागणपती मंदिर हे मुंबई जवळच आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील टिटवाळा या छोट्याशा गावात हे गणपती मंदिर स्थित आहे. हे ठिकाण प्राचीन दंतकथेने नटलेलं आहे. मंदिरात स्थापित केलेल्या गणेशमूर्तीची पूजा केल्यास विभक्त झालेल्या विवाहित जोडप्यांना एकत्र केल जाऊ शकते. त्यासोबतच इच्छित लोकांचे विवाह सहजपणे निश्चित केले जाऊ शकतात. या विश्वासामुळे मंदिरात मोठ्या संख्येने भाविक एकत्र येत असतात. मंगळवारी या मंदिरात भाविकांची खूप गर्दी असते.

गणपतीपुळे मंदिर, रत्नागिरी –

गणपतीपुळे हे एक छोटस गाव आहे. जे गणेशाच्या प्रसिद्ध मंदिरासाठी ओळखले जाते. येथील श्री गणेशाची मूर्ती स्वयंभू असून ती 400 वर्षे जुनी आहे. फेब्रुवारी ते नोव्हेंबर या काळात सूर्यप्रकाश थेट मूर्तीवर पडेल, अशा पद्धतीने मंदिराचं बांधकाम करण्यात आले आहे. या मंदिरात गणेशभक्त टेकडीभोवती प्रदक्षिणा घालतात. हे मंदिर समुद्र किनारी वसलेले आहे.

डोडा गणपती मंदिर, बंगळुरु –

बंगळुरूपासून १३ किमी अंतरावर बसवनगुडी परिसरात असणाते, डोडा गणपती मंदिर हे फार प्रसिद्ध आहे. डोडा गणपतीच्या मंदिराचं नातं गौडा या राज्यकर्त्यांशी जोडलेले आहे. हे मंदिर सुमारे ५०० वर्षांपूर्वी बांधलं गेल्याचे मानलं जातं. दक्षिण भारतातील सर्वात आश्चर्यकारक मंदिरांपैकी एक म्हणजे बंगळुरूचे डोडा गणपती मंदिर. डोडा या शब्दाचा अर्थ मोठा त्याच्या नावाप्रमाणेच, बंगळूरमध्ये असलेल्या या मंदिरात १८ फूट उंच आणि १६ फूट रुंद गणेशाची मूर्ती आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती काळ्या ग्रॅनाइटच्या एका खडकावर कोरण्यात आली आहे.

रणथंबोर गणेश मंदिर, राजस्थान –

राजस्थानच्या रणथंबोर बांधलेले गणेश मंदिर केवळ भारतातच नव्हे, तर जगातील पाहिलं गणेश मंदिर मानलं जात. या मंदिरात गणेशाची त्रिनेत्री मूर्ती आहे. त्रिनेत मूर्ती राजस्थानच्या सवाई माधवपूर जिल्ह्यातील विध्याचल आणि अरवली जिल्याच्या मध्ये वसलेले आहे. १००० वर्षाहून अधिक जूने हे मंदिर रणथंबोर किल्ल्यातील सर्वात उंच ठिकाणी बांधले आहे. विशेष गोष्ट म्हणजे हे गणपती मंदिर हे राजस्थानमधील पहिले मंदिर आहे. जिथे गणपतीचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत दिसतं. या मंदिरात गणपतीची पत्नी रिद्धी आणि सिद्धी आणि दोन मुलं शुभ-लाभ देखील आहेत.

खजराना गणपती मंदिर, इंदोर –

खजराना गणपती मंदिर हे मध्य प्रदेशातील इंदोर येथे आहे. हे स्वयंभू मंदिर आहे. हे मंदिर राणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधलं होते. खजराना मंदिरात गणेशाची तीन फुटी मूर्ती आहे, ही मूर्ती जवळच्या विहिरीतून बाहेर काढण्यात आली होती. देशातील सर्वात श्रीमंत गणेश मंदिरांमध्ये खजराना मंदिराचे नाव समाविष्ट केलेले आहे. येथे भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण होते असे मानले जाते. नवस पूर्ण झाल्यानंतर भाविक येथे येतात आणि गणेशमूर्तीच्या पाठीवर उलटे स्वस्तिक बनवतात आणि भोग अर्पण करून देवाला कृतज्ञता व्यक्त करतात.

वरसिध्दी विनयानगर मंदिर, चेन्नई –

चेन्नईमधील बेसंत नगर भागात असलेलं वरसिद्धि विनयगर मंदिर भाविकांचं श्रद्धास्थान आहे. येथे दरवर्षी भव्य गणेशोत्सवाचं आयोजन केले जाते. या मंदिरात गरिबांसाठी एक मोठा भंडारा आयोजित केला जातो. मंदिरात सामाजिक कार्याला विशेष महत्त्व दिलं जातं. ही मूर्ती चुनखडी, गूळ, विटा आणि देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांतील पवित्र माती आणि पाण्याच्या मिश्रणाने बनवण्यात आली आहे.

मोती डुंगरी गणेश मंदिर, जयपूर –

जयपूरमधील प्रसिद्ध मोती डूंगरी गणेश मंदिर सतराव्या शतकात बांधलं गेल होत. किल्ले आणि टेकड्यांच्या मध्यभागी वसलेलं हे मंदिर राजस्थानातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरातील गणेशमूर्ती ही सुमारे पाचशे वर्षे जुनी आहे. मोती डुंगरी मंदिरात प्रवेश करण्यासाठी भाविकांना कोणतेही प्रवेश शुल्क भरावे लागत नाही.

विनायक देवरु मंदिर, कर्नाटक –

कर्नाटक येथे सुमारे १५०० वर्षे जुने श्री विनायक देवरू मंदिर आहे. या मंदिर असलेली गणेशाची मूर्ती ही गोकर्ण मंदिरातील मूर्तीशी मिळतीजुळती आहे. या मूर्तीमध्ये गणेशाच्या एका हातात कमळाचं फूल आहे, तर दुसऱ्या हातात मोदकांची मिठाई आहे. हे मंदिर त्याचं द्रविडीयन शैलीची विस्तृत वास्तुकला आणि मोहक डिजाईनसाठी ओळखले जाते.

हे ही वाचा: 

बैलपोळा सण का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्व…

पोटाच्या उजव्या बाजूला खूप त्रास होतोयं का? तर हेही कारणे असू शकतात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss