Monday, May 20, 2024

Latest Posts

Maghi Ganesh Jayanti 2023, माघी गणेश जयंतीसाठी उकडीचे मोदक बनवण्याची सोपी पद्धत

Maghi Ganesh Jayanti 2023 : गणेशोत्सव म्हंटल कि धमाल मस्ती आलीच. गणेशोत्सव म्हटलयावर बाप्पाची मनोभावाने सेवा केली जाते आणि बाप्पाचे आवडीचे पदार्थ देखील बनवले जातात. बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक. बाप्पाला आवडला म्हणजे आपल्याला आवडायलाच पाहिजे.

Maghi Ganesh Jayanti 2023 : गणेशोत्सव म्हंटल कि धमाल मस्ती आलीच. गणेशोत्सव म्हटलयावर बाप्पाची मनोभावाने सेवा केली जाते आणि बाप्पाचे आवडीचे पदार्थ देखील बनवले जातात. बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक. बाप्पाला आवडला म्हणजे आपल्याला आवडायलाच पाहिजे. मोदक हा लहान मुलांपासून ते मोठ्यां माणसांपर्यंत सर्वांचा आवडीचा पदार्थ. बाप्पा आल्यावर घरोघरी नैवेद्यासाठी मोदक तयार केले जातात. मोदकाचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. पारंपरिक पद्धतीने उकडीचे मोदक (UKADICHE MODAK) तयार केले जातात. पण बऱ्याचदा उकडीचे मोदक घरी तयार करणे अनेकांना खूप अवघड वाटते पण आज आम्ही तुम्हाला उकडीचे मोदक अगदी सोप्या पद्धतीने कसे करायचे ते सांगणार आहोत.

उकडीचे मोदक तयार करण्यासाठी साहित्य –

२ कप ओलं नारळ
१ कप गुळ
१ कप तांदुळाचे पीठ
१ कप पाणी
२ चमचे तेल
१ चमच वेलची पावडर
मीठ (चवीनुसार)

सारण कृती –

  • सर्वप्रथम कढईमध्ये किसलेल्या नारळ व चिरलेला गुळाला मध्य आचेवर मिश्र करत रहा.
    गुळ वितळयानंतर त्या मध्ये वेलची पावडर घाला, आता तुमचे सारण तयार झाले आहे आता ते भांड्यामध्ये काढून घ्यावे.

उकडीची कृती –

  • मोठया आचेवर गॅसवर कढईमध्ये पाणी घालून त्यात मीठ, २ चमचे तेल घालून उकळून घ्या.
    आता गॅस मध्यम आचेवर करून १ कप तांदळाचे पीठ घाला आणि मिक्स केल्यावर झाकण ठेवून १० मिनिट पर्यंत शिजवून घ्या .
    पीठ शिजल्यानंतर मिक्स करून घ्या मग ते भांड्यामध्ये काढा, मग हाताला तेल आणि पाणी लावून पीठ मऊ होईपर्यत मळून घ्यावे.

मोदकची कृती –

  • सर्वप्रथम मोदकाच्या साचाला आतमधुन तेल लावून घ्या आता पिठाचा लहान गोळा करून मोदकाच्या साचाला सर्व बाजूनी पाकळी भरून त्यात सारण घालून साचाच्या पूर्णपणे बंद करून घ्या. मग साचा उघडून मोदक तयार होईल.
    आता उकडीसाठी एक प्लेटमध्ये तेल लावून त्यावरती सगळे मोदक ठेवा, इडलीच्या कुकरात किंवा कुठल्याही भांड्यामध्ये १/५ कप पाणी टाकून मोदकाच्या प्लेटला ठेवून १० मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवून उकडीसाठी ठेवून द्या, मग त्यानंतर तयार होणार तुमचे उत्तम व स्वादिष्ट उकडीचे मोदक.

Latest Posts

Don't Miss