spot_img
spot_img

Latest Posts

श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना करताना ‘या’ गोष्टीची काळजी घ्या

गणपती बापाच्या आगमनाला आता खूप थोडे दिवस उरलेले आहेत. सर्वत्र आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पाला आपले आराध्य दैवत मानले जाते.

गणपती बापाच्या आगमनाला आता खूप थोडे दिवस उरलेले आहेत. सर्वत्र आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पाला आपले आराध्य दैवत मानले जाते. गणपतीत आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणले जाते. सर्व विघ्नांचा नाश करणारा अशा विघ्नहर्त्याची मनोभावे पूजा ही केली जाते. यंदा 19 सप्टेंबरला गणेशोत्साला धूमधडाक्यात सुरुवात होणार आहे. यावर्षी आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी काही खास गोष्टींची काळजी घ्या. गणपती बाप्प्पाची मूर्ती कशी असावी आणि त्याबाबतचे शास्त्रानुसार, काही नियम जाणून घ्या.

श्री गणेशाची स्थापना करताना या गोष्टीची काळजी घ्या.

गणेश चतुर्थीला गणपती घरी आणला जातो. तुमच्या घरी ही गणपती येणार असेल तर लक्षात ठेवा की केवळ पांढर्‍या मदार मूळ किंवा मातीपासून बनवलेली गणेशमूर्ती पूजेसाठी शुभ मानली जाते. याशिवाय सोने, चांदी आणि तांबे इत्यादीपासून बनवलेल्या मूर्ती ही घरी आणता येतात. पूजेमध्ये केवळ प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा इतर कोणत्याही सामग्रीची मूर्ती ठेवणे हे अशुभ मानले जाते. गणपतीची मूर्ती खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी. डाव्या बाजूच्या सोंडेच्या गणपतीला वामुखी म्हणतात. वाममुखी गणपतीची मूर्ती घरी आणणे हे शुभ असते. डाव्या सोंडेच्या गणपतीची पूजा करणे हे सोपे असते, असे म्हटले जाते. मात्र, उजव्या सोंडेच्या गणपतीच्या पूजेसाठी विशेष नियमाचे पालन करने बंधनकारक आहे. असे मानले जाते की, डाव्या बाजूला सोंड वाहणाऱ्या गणपतीच्या मूर्तीमध्ये चंद्राचा वास असतो आणि उजव्या बाजूला सोंड असलेल्या मूर्तीमध्ये सूर्याचा वास असतो.

सध्या लोक सर्व प्रकारच्या गणपती बाप्पाच्या मूर्ती घरी आणू लागले आहेत. आपल्या बाप्पाची मूर्ती वेगळी असावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण गणपतीची पांढऱ्या किंवा सिंदूर रंगाची मूर्ती असणे हे शुभ मानली जाते. त्यामुळेच पांढऱ्या किंवा सिंदूर रंगाची मूर्ती ठेवण्याचा प्रयत्न करा. डाव्या बाजूला सोंड ठेवून मूर्तीची पूजा केल्यास धन, व्यवसाय, संतान सुख आणि वैवाहिक सुख इत्यादींशी संबंधित साधकाच्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. उजव्या बाजूला सोंड असलेल्या गणपतीला सिद्धिविनायक म्हणतात. ज्याची पूजा केल्याने भक्ताला त्याच्या शत्रूंवर विजय प्राप्त होतो आणि त्याच्या जीवनातील अडथळे दूर होतात. गणपती बाप्पाला घरी आणण्यापूर्वी ती मूर्ती तुटलेली नाही याची खात्री करा. गणपतीच्या मूर्तीमध्ये उंदीर, दंतपथक, एका हातात मोदक प्रसाद आणि दुसऱ्या हातात वरमुद्रा असावी.

गणपतीत सिंहासनावर बसलेल्या गणपतीची पूजा घरामध्ये करणे हे खूप शुभ मानले जाते, म्हणून नेहमी सिंहासनावर किंवा घरातील कोणत्याही आसनावर बसलेल्या गणपतीची पूजा करने शुभ असते, म्हणून नेहमी सिंहासनावर किंवा घरातील कोणत्याही आसनावर बसलेल्या गणपतीची मूर्ती खरेदी करा. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये गणेशाच्या मूर्तीची संख्या ही ३, ५,७ किंवा ९ अशी असू नये. याऐवजी २,४,६ किंवा ८ अशी सम संख्येत गणेशाची मूर्ती घरात ठेवू शकता. वास्तुशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती ही सर्व प्रकारचे वास्तू दोष दूर करणारी मानली जाते. वास्तूनुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गणपतीची मूर्ती समोर आणि उजवीकडे ठेवल्याने घराशी संबंधित सर्व प्रकारचे दोष दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी नांदते.

हे ही वाचा: 

प्रसिद्ध अष्टविनायकाच्या ८ गणपतीचा इतिहास, तुम्हाला माहित आहे का?

चटकदार लोणचं चवीने खाताय तर थांबा! या गंभीर आजारांचा करावा लागेल सामना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss