Monday, May 20, 2024

Latest Posts

यंदा गणपती बाप्पाला प्रिय असणारे, ‘या’ ३ रंगाचे कपडे करा परिधान

आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे १९ सप्टेंबर या दिवशी आगमन होणार आहे. सर्वत्र गणपती बाप्पा येण्याची लगबग सुरु झाली आहे. यावर्षी सुद्धा बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु असून सर्वत्र खूप उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण दिसून येते.

आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे १९ सप्टेंबर या दिवशी आगमन होणार आहे. सर्वत्र गणपती बाप्पा येण्याची लगबग सुरु झाली आहे. यावर्षी सुद्धा बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु असून सर्वत्र खूप उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण दिसून येते. ठिकठिकाणी गणपतीचे पंडाल लावण्यात आलेले आहेत. तर सर्वाना प्रश्न पडला असेल की, यंदा कोणते कपडे घालायचे गणपती बाप्पाच्या स्वागताला? यंदा गणेश चतुर्थीचा दिवस हा शुभ आणि खास असावा, यासाठी तुम्ही बाप्पाला आवडणाऱ्या तीन रंगाचे कपडे परिधान करू शकतात. ते तीन रंग गणपती बाप्पाला खूप प्रिय आहेत.

लाल रंग

लाल रंग हा अतिशय शुभ मानला जातो. लाल रंग हा गणपती बाप्पाला ही खूप प्रिय आहे. गणपती बाप्पाची पूजा करताना लाल रंगाच्या कपड्याचा वापर तुम्ही करू शकता. शिवाय तुम्ही या रंगाचे कपडे ही परिधान करू शकतात. तुम्हाला आवड असल्यास तुम्ही एखादी लाल रंगाची साडी ही नेसू शकता. ज्यावर तुम्ही अंबाड्याची एखादी हेअर स्टाइल ही करू शकता. पण हलक्या स्वरुपातील साडी नेसावी, जेणेकरून पूजा – अर्चना किंवा विधी करताना कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत. जर तुम्हाला साडी नेसणे शक्य नसेल तर तुम्ही लाल रंगाचा एखादा ड्रेस परिधान करू शकता. हा ड्रेस देखील वजनामध्ये जड नसावा. लग्नानंतरचा तुमचा हा पहिलाच गणेशोत्सवाचा सण असेल तर मात्र तुम्ही ही खास वेशभूषा करावी. पण पोषाखा बरोबरच वजनदार दागिन्यांमुळे ही कोणतीही गैरसोय होणार नाही, याची तुम्ही काळजी घ्यावी.

हिरवा रंग

हिरवा रंग देखील गणपती बाप्पाचा आवडता रंग आहे. हिरवा रंग हा समृद्धीचे प्रतिक मानला जातो. हिरवा रंग म्हणजे निसर्गाचा रंग. हिरव्या रंगाची साडी नेसून तुम्ही स्वतःला खूप स्टायलिश लुक देऊ शकता. आपल्या साडीवर एखादे कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाउज तुम्हीला मॅच करता येईल किंवा हिरव्या रंगाच्या ब्लाउजसह एखादी ब्राइट रंगाची साडीही तुम्ही नेसू शकतात. तुम्हाला गडद रंग आवडत नसल्यास तुम्ही फिकट रंगाची साडी नेसण्याची विचार करू शकता. हेअर स्टाइल म्हणून तुम्ही हाय पोनी, अंबाडा किंवा तुमच्या आवडीची एखादी हेअर स्टाइल ही करू शकता. यावर मेसी बन हेअर स्टाइल देखील खूप सुंदर दिसेल. साडीवर तुम्ही हलक्या स्वरुपातील दागिने किंवा वजनदार कानातले ही परिधान केले तरीही चालतील.

पिवळा रंग

गणपती बाप्पाची पूजा करताना पिवळ्या रंगाची फुले आणि कपड्यांचा ही वापर केला जातो. पिवळा रंग हा देखील शुभ असून गणपती बाप्पाला प्रिय असल्याचे मानले जाते. पूजेच्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचा ड्रेस ही परिधान करू शकता किंवा मिक्स अँड मॅच हा पर्याय देखील करू शकता. वेगळ्या रंगाचा ड्रेस किंवा ओढणीमुळे ही तुम्हाला साधा आणि सुंदर लुक मिळेल. नवीन कपडे खरेदी करणे शक्य नसल्यास तुम्ही पिवळ्या रंगातील एखादा जुना लेहंगा किंवा ओढणीचा ही वापर करू शकता. तुमच्याकडे एखादा जुना अनारकली ड्रेस असल्यास पूजेच्या दिवशी तुम्ही तो परिधान करू शकता. यावर तुम्ही सुंदर बांगड्या आणि कानातले घालू शकता. यामुळे तुम्हाला अगदी परिपूर्ण पारंपरिक लुक मिळेल.

 

हे ही वाचा: 

गणपतीच्या प्रसादात पहिला मान खोबऱ्याच्या खिरापतीचा

पोळा सणासाठी साहित्य खरेदीकडे ग्राहकांनी फिरविली पाठ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss