Monday, May 20, 2024

Latest Posts

टाईम महाराष्ट्र आयोजित ‘सुंदर माझा बाप्पा’ स्पर्धा २०२२ पारितोषिक वितरण समारंभ

यंदा तब्बल दोन वर्षांनी प्रशासनाच्या परवानगीने नागरिकांनी गणेशोत्सव उत्साहात साजरा केला. कोरोनामुळे सण साजरे करण्यास निर्बंध घेण्यात आले होते. मात्र यंदा महाराष्ट्रासह देशभरात भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. गणेश मूर्तीच्या उंचीची मर्यादा इथ पासून ते ढोल ताशा पथकापर्यंत कोणतीही बंधन असल्याने अगदी दोन वर्षांची कसर यंदा भरून काढल. याच निमित्ताने टाईम महाराष्ट्र कडून सुंदर माझा बाप्पा’ हि स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा आरंभ ३१ ऑगस्ट २०२२ रोजी झाला. त्यानंतर शेवटचा दिवस १५ सप्टेंवबर २०२२ होता. तर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘सुंदर माझा बाप्पा’ या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला होता. आज दि. ५ नोव्हेंबर रोजी या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा हा पार पडला आहे.

  • टाईम महाराष्ट्र आयोजित सुंदर माझा बाप्पा स्पर्धा २०२२ या स्पर्धेचा पहिला क्रमांक पटकावण्याचा मान मिळाला आहे बाळासाहेब रावसाहेब नवले यांनी. बाळासाहेब नवले हे मूळचे चाकण, पुणे येथील आहे. त्यांनी यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाचे डेकोरेशन हुबेहूब गोवर्धन पर्वताचे केले आहे.

  • टाईम महाराष्ट्र आयोजित सुंदर माझा बाप्पा स्पर्धा २०२२ या स्पर्धेचा दुसरा क्रमांक पटकावला आहे धीरज दत्तात्रय पत्की यांनी डमरू वाजवणाऱ्या गोंडस बाल गणेशाचे स्वागत करत कैलास पर्वत असे डेकोरेशन केले आहे.
  • ‘टाईम महाराष्ट्र’ आयोजित सुंदर माझा बाप्पा स्पर्धा २०२२ या स्पर्धेचा तिसरा क्रमांक प्रतिक सुहास निकम यांनी पटकावला आहे. प्रतिक सुहास निकम हे लालबाग परिसरात राहणारे आहेत. त्यांनी चाळीत विराजमान असलेले गणपती बाप्पाचे सुंदर डेकोरेशन केले होते.

‘टाईम महाराष्ट्र’ ‘सुंदर माझा बाप्पा’ आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक बाप्पा सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ही स्पर्धा खुली आणि ऑनलाइन पद्धतीने असल्याने महाराष्ट्रातील विविध भागांतून स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सांगली, पुणे, मुंबई, ठाणे, डोंबिवली, रत्नागिरी, पुणे आदी अनेक शहरे शहरांमधून मोठ्या प्रमाणत नोंदणी आल्या होत्या. सर्वांचे डेकोरेशन हे सुंदर स्वरूपात होते . त्यामुळे परीक्षकांना देखील स्पर्धकांची निवड करण्यास कठीण गेले.

हे ही वाचा :

Uddhav Thackeray Live : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ‘स्मृती स्थळाचे’ सादरीकरण

ईडीच्या कारवाईत भाजप नेते का नाहीत; ते काय धुतल्या तांदळासारखे आहेत का? – छगन भुजबळ

Chandrakant Khaire: काँग्रेस आमदारांच्या फुटीबाबत केलेले वक्तव्य खैरेंकडून मागे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss