spot_img
spot_img
Wednesday, September 20, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

टाईम महाराष्ट्र आयोजित “सुंदर माझा बाप्पा!” गणेशोत्सव स्पर्धा २०२३

यंदाच्या वर्षी पर्यावरण संरक्षणाचे हेच सूत्र पकडत गणेशोत्सव पर्यावरण पूरक करायचा यासाठी ‘टाईम महाराष्ट्र’ ने यंदा ‘सुंदर माझा बाप्पा’ गणेशोत्सव २०२३ स्पर्धेचं आयोजन केलं आहे.

नुकत्याच संपन्न झालेल्या जी-२० शिखर परिषदेत पर्यावरणाच्या समतोलाच्या समस्येवर सगळ्याच राष्ट्रप्रमुखांनी चर्चा करत चिंता व्यक्त केली. यंदाच्या वर्षी पर्यावरण संरक्षणाचे हेच सूत्र पकडत गणेशोत्सव पर्यावरण पूरक करायचा यासाठी ‘टाईम महाराष्ट्र’ ने यंदा ‘सुंदर माझा बाप्पा’ गणेशोत्सव २०२३ स्पर्धेचं आयोजन केलं आहे.

जर तुम्ही देखील तुमच्या घरी किंवा सार्वजनिक गणेश मंडळात ‘ इको फ्रेंडली ‘गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करत असाल, त्याचबरोबर इको फ्रेंडली असे डेकोरेशन (सजावट) करत असाल तर या स्पर्धेच्या माध्यमातून तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. तुम्ही तुमच्या गणपती बाप्पाचे आणि सजावटीचे काही व्हिडिओ आणि फोटो शेअर करत, खालील दिलेल्या नियमांचे पालन करून या स्पर्धेत सहज सहभागी होऊ शकता.

स्पर्धेचे नियम अगदी सोपे आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपला गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित व्हावा आणि सामाजिक भान जपलं जावं हाच आमचा उद्देश आहे. या स्पर्धेसाठी कोणीही बनावट, जुने फोटो किंवा इतरांचे फोटो पाठवू नका. तुम्हाला या स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल तर पुढील माहिती सविस्तर वाचा.

तुमच्या गणपती बाप्पाचा फोटो आणि ३० ते ६० सेकंदचा व्हिडिओ हा timemaharashtra या इंस्टग्राम अकॉउंटला किंवा Time Maharashtra – टाईम महाराष्ट्र या फेसबुक पेजला आम्हाला टॅग करा. आमच्या अकाउंटला टॅग करणे अनिवार्य आहे. फोटो काढताना मोबाईल आडवा धरून शूट करावे.

FaceBook Page – https://www.facebook.com/timemaharashtranews?mibextid=2JQ9oc

Instagram – https://www.instagram.com/timemaharashtra

ही सर्व माहिती आम्हाला खाली दिलेल्या लिंकद्वारे फॉर्म भरून पाठवा :

https://www.timemaharashtra.com/ganeshotsav-competition-2023/ 

“सुंदर माझा बाप्पा!” गणेशोत्सव स्पर्धा २०२३ साठी नोंदणी पूर्णपणे मोफत आहे. कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

“सुंदर माझा बाप्पा!” गणेशोत्सव स्पर्धा २०२२ स्पर्धेची बक्षीसे

  • १ ले पारितोषिक – रोख रक्कम ५००० /- + ट्रॉफी
  • २ रे पारितोषिक – रोख रक्कम ३०००+ ट्रॉफी
  • ३ रे पारितोषिक – रोख रक्कम २०००/- + ट्रॉफी
  • यंदा स्पर्धेसाठी प्रत्येकी १०००/- रपयांची दोन उत्तेजनार्थ बक्षिसे आहेत.

स्पर्धेसाठी तज्ञ आणि अनूभवी परीक्षांचे एक पॅनेल आहे. ज्यात मूर्तीकार, चित्रकार, नेपथ्थ्यकार , पर्यावरण तज्ञ यांचा समावेश आहे. जे बहुविध निकषांच्या आधारे पारितोषिक विजेत्यांचा निर्णय देतील आणि त्यांचा निर्णय अंतिम मानला जाईल.

स्पर्धेच्या तारखा :

  • गणपती स्पर्धा १९ सप्टेंबर २०२३ (मंगळवार) रोजी सुरू होईल.
  • सहभागी होण्याची आणि फोटो/व्हिडिओ आणि संपूर्ण माहिती सबमिट करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३ (शनिवार)आहे.
  • घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच १५ ऑक्टोबर २०२३ रोजी विजेते घोषित केले जातील.
  • एकदा निकाल घोषित झाल्यानंतर प्रत्येक सहभागींना ईमेलद्वारे सूचित केले जाईल आणि टाईम महाराष्ट्र या वेबसाईट वर देखील निकाल जाहीर केला जाईल.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा :

Time Maharashtra

Email id – [email protected]

Whats app No – 9769612336

Latest Posts

Don't Miss