Tuesday, May 7, 2024

Latest Posts

GUDI PADWA 2023, गुढी उभारताना कलश उलट का ठेवतात? जाणून घ्या कारण

मराठी नवीन वर्षाचा मुहूर्त म्हणजे गुढी पाडवा. गुढी पाडवा हा मराठी वर्षातील सर्वात पहिला सण असतो. या दिवसाची सुरुवात गुढी उभारून केली जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक शुभ कामे केली जातात.

मराठी नवीन वर्षाचा मुहूर्त म्हणजे गुढी पाडवा. गुढी पाडवा हा मराठी वर्षातील सर्वात पहिला सण असतो. या दिवसाची सुरुवात गुढी उभारून केली जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक शुभ कामे केली जातात. तुम्ही कधी पाहिलं आहे का गुढी वर तांब्याचा कलश उलटा घालतात. धर्मशास्त्रामध्ये असे सांगण्यात आले आहे की तांब्याचा कलश गुढीवर उलट ठेवावा पण तुम्हाला या मागचे कारण माहिती आहे का? गुढी उभारताना कलश उलट का ठेवतात? आज आम्ही तुम्हाला या विषयी सांगणार आहोत.

सनातन धर्मानुसार गुढी पाडव्याच्या दिवशी गुढी उभारताना तांब्याचे तोंड जमिनीकडे असल्यामुळे तांब्याच्या कलशाच्या पोकळीतून तांब्यात असलेली कडुलिंबाची पाने आणि रेशमी वस्त्र हे सात्त्विक लहरींनी भारीत बनते. भूमीच्या आकर्षणशक्‍तीमुळे हा रूपांतरित सगुण ऊर्जाप्रवाह जमिनीच्या दिशेने संक्रमित होण्यास मदत करतो. गुढीच्या तांब्याची दिशा उलटी ठेवली तर संपूर्णतः ऊर्ध्व दिशेने लहरी बाहेर निघतात आणि जमिनीलगतच्या काही स्तराचे शुद्धीकरण न झाल्याने वायूमंडलातील फक्‍त ठराविक अशा ऊर्ध्व पट्ट्याचेच शुद्धीकरण होते.

तांब्याच्या कलशाच्या तोंडाची दिशा भूमीकडे ठेवल्याने त्यातून निघणाऱ्या लहरींचा फायदा जमिनीच्या लगतच्या आणि मध्यम पट्ट्यातील वायूमंडलाला, याबरोबरच उर्ध्वमंडलाला मिळण्यास साहाय्य होते. त्यामुळे कलश हा उलटा ठेवतात. तांब्याच्या कलशातून संक्रमित झालेल्या निर्गुण लहरींचे कडुनिंब आणि रेशमी वस्त्र यांच्यामधून प्रभावी ग्रहण आणि प्रक्षेपण होते तर कडुलिंब, कलश आणि वस्त्र या तिघांमधून निर्माण होणार्‍या लहरींनी वायूमंडल शुद्ध होते. त्यामुळे गुढी पाडवाला कडूलिंंब, कलश आणि रेशमी वस्त्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

हे ही वाचा:

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ‘चुनावी जुमला’ असलेला अर्थसंकल्प, अजित पवारांची टीका

पीएम गृहनिर्माण योजनेबाबत मोठी बातमी, योजनेच्या रकमेत करण्यात आली ७९ हजार कोटींची वाढ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss