Sunday, April 28, 2024

Latest Posts

तिळगुळ घ्या गोड गोड बोला… म्हणत यंदा Makar Sankrati च्या द्या हटके शुभेच्छा!

यंदाच्या वर्षी दिनांक १५ जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा (Makar Sankrati Messages) सण साजरा केला जाणार आहे. २०२४ या वर्षाचा हा पहिला सण आहे.

यंदाच्या वर्षी दिनांक १५ जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा (Makar Sankrati Messages) सण साजरा केला जाणार आहे. २०२४ या वर्षाचा हा पहिला सण आहे. या सणाला विशेष महत्व आहे. प्रत्येक महिन्यात सूर्याचे जे राशीपरिवर्तन होते, त्याला संक्रांत असे म्हणतात. एकूण १२ संक्रांती वर्षभरात येत असतात, अशा प्रकारे प्रत्येक महिन्यात १ संक्रांत असते. तसेच अनेक ठिकाणी या दिवशी पतंग महोत्सव असतो. अशा या सणानिमित्त तुमच्या प्रियजणांना शुभेच्छा संदेश पाठवण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच. आज आपण असेच काही विशेष शुभेच्छा संदेश आणि व्हाट्सअप स्टेटस पाहूया.

पतंगोत्सव साजरा करताना नायलॉन मांजा हद्दपार करु,
पक्षी प्राणी यांचे जीवन वाचवू…
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

तिळगुळाच्या उत्सवात पाहूया पतंगाची शान
नायलॉन मांजा टाळून वाचवू पक्ष्यांचे प्राण
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

“गोड नाती गोड सण
तुम्हाला मिळो खूप धन
आनंद ऐश्वर्य सुख समृद्धी
राहो तुमच्या अंगणी
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा”

“म…… मराठमोळा सण
क…… कणखर बाणा
र …… रंगीबिरंगी तिळगुळ
सं…… संगीतमय वातावरण
क्रा…… क्रांतीची मशाल…
त …… तळपणारे तेज
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा”

तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु… मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..! संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

काळया रात्रीच्या पटलावर चांदण्यांची नक्षी चमचमते काळया पोतीची चंद्रकळा तुला फारच खुलून दिसते. पहिल्या संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा!

जपू तिळाप्रमाणे स्नेह वाढवू गुळाप्रमाणे गोडवा , निर्माण करू भेद-भाव मुक्त समाज प्रेरणा , मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! तिळगूळ घ्या, गोड-गोड बोला…

पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला-पावलावर भेटतात पन मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी पावले झिजवावी लागतात अशाच सोन्यासारख्या माणसांना मकर संक्रातीच्या हादर्दीक शुभेच्छा

आकाशाला टेकतील असे हात नाहीत
माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे,
चंद्र- सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे,
पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे ह्रदय आहे माझे.
तिळगुळ घ्या गोड़ बोला.

हे ही वाचा:

Raj Thackeray Live : आत्ताचं सरकार ही सहकार चळवळ नाही, सहारा चळवळ

भव्य नाट्ययात्रा आणि शिवराज्याभिषेक सोहळा,शंभराव्या नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्याचे खास आकर्षण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss