Wednesday, May 8, 2024

Latest Posts

हॉटेल स्टाईल Chicken kathi roll बनविण्यासाठी ही खास रेसिपी नक्की ट्राय करा

बहुतांश जणांना नॉन व्हेज (Non Veg) पदार्थ खाण्यास भरपूर आवडतात. हॉटेलमध्ये गेल्यावर अनेकजण नॉन व्हेज खाण्यास प्राधान्य देतात.

बहुतांश जणांना नॉन व्हेज (Non Veg) पदार्थ खाण्यास भरपूर आवडतात. हॉटेलमध्ये गेल्यावर अनेकजण नॉन व्हेज खाण्यास प्राधान्य देतात. नॉन व्हेज पदार्थामध्ये चिकनचे पदार्थ हे बहुतेकांना आवडतात. हॉटेलमध्ये गेल्यावर चिकनला मोठ्याप्रमाणावर मागणी केली जाते. चिकनचे चमचमीत पदार्थ लहानमुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकालाच आवडतात. बहुतेक लोक चिकनचे ठराविक पदार्थ घरी बनवतात. मात्र असे चमचमीत पदार्थ खाण्यासाठी आपण नेहमी हॉटेलमध्ये जातो. मात्र नेहमी हॉटेलमध्ये जाऊन चमचमीत पदार्थ खाणे आपल्याला शक्य होत नाही शिवाय अश्या पदार्थांच्या किमतीही जास्त असतात. हॉटेलचे पदार्थ खाऊन आपल्या त्रास सुद्धा होऊ शकतो. अशातच तुम्ही चिकनचे चमचमीत पदार्थ घरीसुद्धा बनवू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हॉटेलस्टाईल चिकन काठी रोल कसा बनवतात याबद्दल सांगणार आहोत. या चिकन काठी रोलला हॉटेलसारखी चव येण्यासाठी आमची ही खास रेसिपी नक्कीच ट्राय करा.

चिकन काठी रोल बनविण्यासाठी लागणारे साहित्य:

गव्हाचे पीठ दीड वाटी
ड्राय यीस्ट १ चमचा
बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी
बारीक चिरलेली सिमला मिरची अर्धी वाटी
चिरलेली हिरवी मिरची
चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी
चवीनुसार मीठ
तेल

चिकन काठी रोल बनविण्याची कृती:

चिकन काठी रोल बनविण्यासाठी सर्वप्रथम एका बाउल मध्ये चार चमचे कोमट पाणी घालून त्यात साखर, थोडे मीठ, आणि यीस्ट घालून साधारण १५ ते २० मिनिटे झाकून ठेवावे त्यानंतर कणकेमध्ये यीस्ट व्यवस्थित मिसळवून त्याला भिजवून ठेवा. साधारण २ तासांनी पीठ चांगल्या प्रकारे फुगेल त्यानंतर त्या पिठाच्या पोळ्या अगदी पातळ लाटून घेऊन व्यवस्थित भाजून घ्याव्यात. दुसरीकडे चिकनचे स्टफिंग (Stuffing) करण्यासाठी तुमच्याकडे असलेला एक पॅन गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल टाकून गरम करत ठेवा. त्या तेलामध्ये कांदा, हिरवी मिरची टाकून चांगल्या प्रकारे परतवून घ्या. त्यानंतर त्यामध्ये सिमला मिरची टाकून पुन्हा परतवून घ्या. त्यानंतर त्यात लसूण आणि त्याचबरोबर चिकन खिमा घाला आणि साधारण ३ ते ५ मिनिटे परतून कडेने तेल सुटायला लागल्यास मीठ घाला. त्यानंतर ते चांगल्या प्रकारे परतवून घेऊन गॅस बंद करा. तयार झालेल्या पोळी मध्ये चिकनचे स्टफिंग भरून त्याचा रोल तयार करा. अशाप्रकारे तुमचे हॉटेल स्टाईल चविष्ट चिकन काठी रोल तयार होईल.

हे ही वाचा : 

श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली मतदारसंघावरून दिली प्रतिक्रिया

Mouni Roy चे अंधेरीत नवे रेस्टॉरंट, अनेक कलाकारांनी लावली हजेरी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss