Saturday, May 4, 2024

Latest Posts

आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या Nitin Gadkari यांच्यावर कारवाई कधी? Atul Londhe यांचा सवाल

काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपचे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला असून निवडणूक आयोगाकडे त्यांच्यावर कारवाई कधी करणार असा सवाल उपस्थित केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीला सुरुवात झाली असून मतदानाचा पहिला टप्पा पार पडला आहे. मतदानाचे अजून सहा टप्पे बाकी असून सर्वच पक्ष प्रचारासाठी जोर लावत आहेत. राजकीय नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला असून प्रचारासाठी राजकीय नेते वेगवेगळ्या मार्गांचा वापर करत असल्याचे दिसत आहे. अश्यातच, महाराष्ट्र काँग्रेसचे (Congress) प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी भाजपचे (BJP) नागपूर लोकसभा मतदारसंघाचे (Nagpur Loksabha Constituency) उमेदवार नितीन गडकरी (Nitin Gadkari)आचारसंहितेचे उल्लंघन (Code of Conduct) केल्याचा आरोप केला असून निवडणूक आयोगाकडे (Election Commission) त्यांच्यावर कारवाई कधी करणार असा सवाल उपस्थित केला आहे.

“भारतीय जनता पक्षाचे नागपूर मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केल्याच्या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने NSVM फुलवारी शाळेच्या संचालकावर कारवाई करण्याचे निर्देश दिले, त्याचे स्वागतच आहे परंतु नितीन गडकरी यांच्यावर कारवाई केलेली नाही. शाळा संचालकांना दोषी ठरवून कारवाई होत असताना नितीन गडकरी यांच्यावर कारवाई कधी करणार?” असा प्रश्न अतुल लोंढे यांनी केला आहे.

यासंदर्भात माहिती देताना अतुल लोंढे म्हणाले की, “१ एप्रिल रोजी NSVM फुलवारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान वैशाली नगर भागात भाजपा उमेदवार नितीन गडकरींच्या प्रचार रॅलीत सहभागी केले होते. शाळकरी मुलांना राजकीय प्रचारासाठी वापरणे हे चुकीचे व अत्यंत गंभीर आहे. निवडणुकीसंदर्भातील कार्यक्रमात लहान मुलांचा वापर करु नये असे निवडणुक आयोगाचे स्पष्ट निर्देश असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या प्रकरणी ३ एप्रिल रोजी राज्य निवडणूक अधिकारी यांना पत्र लिहून काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रवक्ता या नात्याने तक्रार दाखल केली होती, या तक्रारीची दखल घेऊन शाळा संचालकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत ही स्वागतार्ह बाब आहे पण शाळकरी मुलांना प्रचारासाठी बोलावणारे व त्यासाठी शाळेवर दबाव टाकणा-या नितीन गडकरी आणि भाजपावर काहीही कारवाई केलेली नाही. या प्रकरणात नितीन गडकरी आणि शाळेचे संचालक दोघेही दोषी आहेत त्यामुळे नितीन गडकरींवरही कारवाई झाली पाहिजे,” असे अतुल लोंढे म्हणाले.

हे ही वाचा:

PM Modi यांना Congress नेत्याचे खडेबोल, मुस्लिमांवरील वादग्रस्त विधानामुळे Election Commission कडे करणार तक्रार

भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याचे सदा सरवणकरांच्या मुलाला खडेबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss