Thursday, May 9, 2024

Latest Posts

लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा एक उमेदवार जाहीर केल्यानंतर पंकजा मुंडेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या….

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र दौरा करत आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र दौरा करत आहेत. आज त्यांनी आंतरवली सराटीमध्ये मराठा बांधवांशी संवाद साधला. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाचा प्रत्येक जिल्ह्यातून एक उमेदवाराला अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला उभे राहता येणार आहे, असा निर्णय घेण्यात आला आहे. याच निर्णयावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, अत्यंत साधेपणे उभे राहिलेले हे आंदोलन आणि त्यातून मनोज जरांगे यांनी घेतलेली भूमिका ही स्वागतार्ह आहे. याआधी सुद्धा मी सांगितले होते मनोज जरांगे पाटील हे राजकीय पक्षासोबत उभे राहणार नाहीत. हे त्यांनी आज पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. शेवटी निवडणुकीमध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार देणे न देणे हा त्यांचा विषय आहे,अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे. काल मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून पंकजा मुंडे यांचा ताफा जात असताना काही मुलांनी हातामध्ये काळी झेंडे धरून एक मराठा लाख मराठा अश्या घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर बीड पोलीस स्थानकात ५ जणांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र असे गुन्हे दाखल करू नये अशी पत्राद्वारे मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. पोलिसांना दिलेल्या पत्रात पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत, की ती लहान मुले आहेत. त्यांच्याकडून अनावधानाने ते झालं असेल, मात्र केवळ झेंडे दाखवले म्हणून लहान मुलांवर गुन्हे दाखल करू नका, अशी विनंती पंकजा मुंडे यांनी पत्रातून केली आहे.

आज पंकजा मुंडेंचं बीड मधील परळीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. पंकजा मुंडे यांनी पारंपारिक बंजारा समाजाची वेशभूषा परिधान केली होती. त्यावेळी त्या म्हणाल्या, मी खूप लोकांचे हाल होताना पहिले आहेत. जेव्हा सत्ता आली तेव्ही मी सर्व केलं आहे. २०१४ ते २०१९ मध्ये मी केलला विकास आणि मी निर्माण केलेला विश्वास. हा मुद्दा प्रत्येक जातीपातीची भिंत पडून टाकणारा आहे. या जिल्ह्यात राष्ट्रवादी आमच्यासोबत आली आहे. त्यामुळे मला आता जिल्ह्यात जास्त फिरता येईल. तुमची बहीण यावेळी संसदेत जाणार आहे. मी शूरवीर योद्धा आहे. तुमच्यासाठी संसदेत बसून युद्ध लढेन, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

हे ही वाचा:

आपले राजकारण जिवंत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी…Piyush Goyal यांचा हल्लाबोल

आपल्या बापजाद्यांनी केलेल्या अत्याचाराविरूद्ध या माणसानं.. Kiran Mane यांचं म्हणणं तरी काय?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss