Saturday, April 27, 2024

Latest Posts

आपल्या बापजाद्यांनी केलेल्या अत्याचाराविरूद्ध या माणसानं.. Kiran Mane यांचं म्हणणं तरी काय?

नेहमीच सोशल माध्यमांवर सक्रीय असलेल्या किरण माने या अभिनेत्याने एक पोस्ट केली आहे. अभिनेता किरण माने यांनी महात्मा गांधी यांच्या एका चित्रपटाबद्दल भाष्य केले आहे. त्यात शेवटी बाप हा बाप असतो, असे म्हणत महात्मा गांधी यांच्याबद्दल आदरभाव व्यक्त केला आहे.  

काय म्हणाले किरण माने? 

एखादा माणूस ज्या शत्रूविरूद्ध आयुष्यभर लढला, त्याच शत्रूच्या पुढच्या पिढ्यांनी त्या माणसाच्या विचारांनी, जीवनसंघर्षानं भारावून जावं… त्याच्यावर सिनेमा काढावा… त्यात आपल्या बापजाद्यांनी केलेल्या अत्याचाराविरूद्ध या माणसानं कशी झुंज दिली, हे प्रभावीपणे दाखवावं… अख्ख्या जगाचे डोळे दिपवावेत… अफलातून आहे हे! जगात एकाच नादखुळा माणसाला हा सन्मान लाभलाय… महात्मा गांधी.

तरीबी या म्हातार्‍याचा राग का येत नाय आपल्याला?

गांधीबाबा आयुष्यभर ब्रिटीशांविरूद्ध लढला. ब्रिटीशांनी त्याचा छळ केला, दुस्वास केला, दुनियेचा त्रास दिला, तुरूंगात टाकला.. पण ह्या बाबानं ब्रिटीशांना या देशातनं हाकलूनच दम खाल्ला. यानंतर पस्तीस वर्षांनी एका ब्रिटीश दिग्दर्शकानंच या महात्म्यावर नितांतसुंदर सिनेमा काढला! दिग्दर्शक रिचर्ड ॲटनबरो गांधीबाबाचं चरित्र वाचून भारावलावता. असा माणूस पृथ्वीतलावर होता यावर त्याचा विश्वास बसंना. बरं, गांधीच्या स्टोरीत व्हिलन कोण? तर या ॲटनबरोचाच देश ! सगळे ब्रिटीश. तरीबी या म्हातार्‍याचा राग का येत नाय आपल्याला? तो गांधीवर लै लै लै खोलात जाऊन अभ्यास करतो. जगभरातल्या इतिहासकारांनी लिहीलेला गांधी वाचतो. जितका वाचंल तितका तो गांधीच्या प्रेमात पडतो ! मनाशी पक्का विचार करतो. या बाबावर सिनेमा बनवायचा. बास. अमेरिकन लेखक रिचर्ड जाॅन ब्रेलीला घेऊन झपाटल्यासारखा कामाला लागतो. विशेष म्हणजे गांधीजींची भुमिका करतो ब्रिटीश अभिनेता बेन किंग्जले!

उगाच नाही म्हणत रं त्याला राष्ट्र’पिता’!

आपल्या भारतीय महामानवावर परदेशी लोकांनी बनवलेला हा एकमेव सिनेमा आहे जो संपूर्ण जगात डोक्यावर घेतला गेला. त्या काळात या सिनेमानं १२८ मिलीयन डाॅलर्स कमावले. ऑस्कर अवाॅर्डमध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमा, अभिनेता, दिग्दर्शक यासह आठ पारितोषिकं पटकावली. ब्रिटिश फिल्म इंस्टीट्यूटनं विसाव्या शतकातल्या महान ब्रिटीश सिनेमांमध्ये ‘गांधी’ला स्थान दिलं. अमेरिकन फिल्म इंस्टीट्यूटनं जगातल्या प्रेरणादायक सिनेमांमध्ये गणना केली! माझ्या भावा, उगाच नाही म्हणत रं त्याला राष्ट्र’पिता’! बाप आखिर बाप होता है… बंदे मे अभी भी बहोत दम है. इस हस्ती को मिटानेवाले खुद मिट गये… ये फिर भी डट के खडा है… लब्यू बापू.

हे ही वाचा:

विजय शिवतारे अनंतराव थोपटे यांच्या भेटीनंतर घेणार ‘या’ मोठ्या नेत्याची भेट

मराठवाड्यात शिंदेंच्या शिवसेनेला एकच जागा मिळणार, संभाजीनगरची जागा भाजपाकडे जाण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss