Friday, May 10, 2024

Latest Posts

पवारांचा हात लागल्याशिवाय माणसं मोठी होत नाहीत,सुशीलकुमार शिंदेनी केलं शरद पवारांचं तोंडभरून कौतुक

हातामध्ये कला असते,पण त्याला मार्केट मिळत नाही. पवार साहेबांनी हात लावल्याशिवाय माणसं मोठी होत नाहीत. त्याच उदाहरण मी आहे. शरद पवारांनी मला हाथ लावला आणि मी मोठा झालो,"या शब्दांत सुशीलकुमार यांनी शरद पवारांचं कौतुक केलं आहे.

महाराष्ट्रातील पुण्यामध्ये आज चित्रकार रुचिरा विनय मणियार यांच्या चित्रांच्या चित्र प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात होता. या कार्यक्रमाचे उदघाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या सोबत या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासोबत पवार कुटुंबातील इतर सदस्यांनी देखील हजेरी लावली होती. तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत खासदार श्रीनिवास पाटील, आणि संगीतकार,गीतकार अजय-अतुल यांसारखे मान्यवर देखाल उपस्थित होते.पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये मध्ये या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

यावेळी शरद पवार यांच्यासोबत पवार कुटुंबातील इतर सदस्य देखील उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार, रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार, रोहित पवार यांच्या आई सुमित्रा पवार, तसेच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपस्थित होते. यावेळी भाषण करताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवार यांचे तोंडभरून कौतुक केलं.

यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले,”हातामध्ये कला असते,पण त्याला मार्केट मिळत नाही. पवार साहेबांनी हात लावल्याशिवाय माणसं मोठी होत नाहीत. त्याच उदाहरण मी आहे. शरद पवारांनी मला हाथ लावला आणि मी मोठा झालो,”या शब्दांत सुशीलकुमार यांनी शरद पवारांचं कौतुक केलं आहे.

त्यानंतर शरद पवार यांनी देखील आपल्या भाषणामध्ये त्यांचे काही जुने किस्से सांगितले. यावेळी बोलताना शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील यांना तिकीट देण्यावेळेचा देखील प्रसंग सांगितला. ते म्हणाले,” इथे माझे बरेच मित्र आहेत. आम्ही पुण्यात एकत्र शिकलो, आपल्या क्षेत्रात वेगळं करणारे आम्ही मित्र होतो. श्रीमती गांधी यांनी माझी सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आणि आम्ही दुसरा पक्ष काढण्याचा निर्णय घेतला. निवडणूक लागल्या आणि साताऱ्यासाठी मला श्रीनिवास पाटील यांचं नाव आठवलं. पण मध्यंतरी आम्हाला त्यांना तिकीट देणं जमाल नाही.”असं शरद पवार यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

बर्थडे गर्ल दीपिका पदुकोणचे काही खास फोटो, आणि तिच्या सिनेसृष्टीमधील पदार्पणासंदर्भात खास माहिती

महाराष्ट्राच्या राजकारणात होणार उलथापालथ?, नवीन समीकरण समोर येण्याची चिन्ह

एअर इंडियाच्या विमानात पुन्हा घडली तीच किळसवाणी घटना, पुन्हा पुरुषाकडून महिलेच्या ब्लॅंकेटवर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss