Wednesday, May 8, 2024

Latest Posts

साक्षात PM Modi यांनी अर्ज भरला तरीही Rajan Vichare…काय म्हणाल्या Sushma Andhare?

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधला असता, कल्याण आणि ठाणे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर भाष्य केले. मी आरोप नाही करत, मी बोलते तेव्हा हातात माहिती घेऊन बोलते. मुक्त संवाद दौऱ्यावेळी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी विशेषतः कल्याण न्यायालयातील वकिलांशी चर्चा केली होती. त्यावेळी वकिलांनी सांगितलं, सर्वात जास्त गुन्हेगारी स्तर हा कल्याणमध्ये आहे. त्यामुळे कल्याण आणि ठाणेमध्ये लढताना आमची पहिली जबाबदारी असेल की, इथला गुन्हेगारी स्तर कसा कमी होईल. इथल्या महिलांना सुरक्षित श्वास घेता येईल का आणि इथली तरुण बेरोजगार मुलं आहेत त्यांच्या हाताला काम भेटेल का? हे पाहणे आधी महत्त्वाचे ठरणार आहे.

पत्रकार धमकी प्रकरणावर बोलतांना सुषमा अंधारे म्हणाल्या की, पियुष गोयल यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकाराला घरात घुसून धमकावलं या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येतोय. पत्रकार वारीश यांची हत्या तसेच वेगवेगळ्या पत्रकारांना दमदाटी करणं, पत्रकारांना ट्रोल करणं हा सगळा प्रकार लोकशाहीला घातक आहे. पत्रकारांच्या बातमीदारीवरच दडपण आणण्याचा प्रकार सध्या सुरु असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या. 

असली-नकलीचा खेळ सध्या चालू आहे

ठाणे लोकसभा उमेदवारबाबत प्रश्न विचारला असता, सुषमा अंधारे म्हणाल्या की, असली-नकलीचा खेळ सध्या चालू आहे. नकली लोकं फार लवकर उघडे पडतायत. नकली लोकांना दिल्लीत मुजरे आणि हुजरे केल्याशिवाय त्यांचं काहीच ठरत नाही. जे २ ते ३ लोकं कोट शिवून तयार आहेत, त्यातील दोघांना सांगा तुमचे कोट विकायची वेळ आलेय. माझ्या माहिती प्रमाणे ठाण्याची जागाच त्यांना मिळत नाही आहे, असे काहीस चित्रं आहे. त्यांची जागा फिक्स नाही, त्यांचा उमेदवार फिक्स नाही त्यांनी इथे येऊन विजयाच्या बाता मारणं हे आश्चर्यकारक आहे. इथे साक्षात मोदीजींनी जरी अर्ज भरला तरी ही जागा राजन विचारे मोठ्या ताकदीने मोठ्या लीडने काढतील, असा विश्वास सुषमा अंधारे यांनी बोलताना व्यक्त केला. 

भावजय आहे माझी शत्रू नाही

आपलं राजकीय क्षेत्र नाही त्यांनी त्यांच्या गायकीच्या क्षेत्रात काम करावं, बँकिंगच्या क्षेत्रात काम करावं, असा सल्ला बोलताना सुषमा अंधारे यांनी अमृता फडणवीस यांना दिला. ज्याचं त्याचं क्षेत्र असतं, त्या क्षेत्रात त्यांनी काम करावं. राजकीय टिप्पणी आपण करू नये हे त्यांना कळलं ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट. मी अमृता वहिनींना गायकीच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या पाहिजेत. मी त्यांचं कौतुक करते, गायकीच्या क्षेत्रासाठी त्यांना शुभेच्छासुद्धा देते, भावजय आहे माझी शत्रू नाही, असे मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले. 

हे ही वाचा:

Naresh Mhaske Exclusive: बहिणीच्या जागी उभे राहिलात आणि त्यांना दुसरीकडे पाठवता, Pankaja Munde यांना टोला

BJP ने चावी दिली तेवढेच बोलणाऱ्या Eknath Shinde यांनी Congress वर बोलू नये, Nana Patole यांचा घणाघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss